Dahisar Politics: युतीचा करिष्मा! महापालिका निवडणुकीपूर्वीच महायुतीला धक्का,शेकडो भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश

BJP Leaders Join MNS In Dahisar: दहिसरमधील राजकारणात उलटफेर झालीय. शेकडो भाजप आणि शिवसेनेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत सामील झाले आहेत. त्यामुळे महायुती युतीला मोठा धक्का बसला आहे.
BJP Leaders Join MNS In Dahisar
MNS gains strength in Dahisar — Hundreds of BJP and Shiv Sena workers join Raj Thackeray’s party ahead of civic polls.saam tv
Published On
Summary
  • दहिसरमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात मनसेत प्रवेश.

  • महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला मोठा धक्का.

  • मनसेला या प्रवेशामुळे संघटनात्मक बळ मिळालं.

काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी पक्षांची मोर्चेबांधणी चालू आहे तर जो तो आपली ताकद वाढवत आहे. त्याच भाग म्हणून अनेक भागात पक्षप्रवेशाचे कार्यक्रम होत आहेत. महायुतीमधील पक्ष महाविकास आघाडीला धक्क्यांवर धक्के देत आहेत. आता हाती आलेल्या बातमीनुसार, आता धक्का महायुतीला बसलाय. महायुतीमधील भाजप आणि शिवसेनेला मनेसनं धक्का दिलाय.

BJP Leaders Join MNS In Dahisar
Nashik Politics: शिवसेना ठाकरे गटाला खिंडार; अनेक कार्यकर्त्यांनी सोडली साथ, शिंदे गटात प्रवेश

दहिसरमध्ये शेकडो भाजप कार्यकर्ते कमळ सोडून इंजिनसोबत जुडले आहेत. दहिसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे. शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्ष प्रवेश होत असल्यानं महायुतीला मोठा झटका मानला जातोय.

BJP Leaders Join MNS In Dahisar
Rohit Pawar: 'तू शांत बस नाहीतर...; रवींद्र धंगेकरांवर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची दादागिरी? रोहित पवारांचा फडणवीसांवर आरोप

मनसेने आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळावा आणि पक्ष प्रवेश कार्यक्रमात शिवसेना शिंदे गट आणि भाजपमधील शेकडो कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केलाय. अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केलाय.

खऱ्या विचारांच्या मागे जनता उभी असते. थोडा वेळ लागतो पण सबर का फल मीठा होता है. जेव्हा लोकांना कळले की दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर काहीही होत नाही, नुसती आश्वासनाची खैरात आहे. तेव्हा आता इतर पक्षातून मनसेमध्ये लोक प्रवेश करत आहेत. उत्तर भारतीय कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या संख्येनं मनसेमध्ये प्रवेश केलाय, अशी प्रतिक्रिया मनसे नेते अविनाश अभ्यंकर दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com