म्हाडाने २०२३ मध्ये २६५ घरांसाठी ऑनलाइन लॉटरी काढली होती
फक्त ९३ विजेत्यांनी घराचा ताबा घेतला असून ७० विजेत्यांनी याकडे पाठ फिरवली आहे
म्हाडाने नोटीस पाठवूनही प्रतिसाद न मिळाल्याने कारवाई सुरू केली आहे.
घराचा ताबा न घेतल्यास विजेत्यांचा हक्क रद्द होऊ शकतो
सर्वसामान्यांचे मुंबई शहरात हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यात म्हाडा कायमच मदत करते. मात्र म्हाडा विजेत्यांना झटका देणारी बातमी समोर आली आहे. साल २०२३ मध्ये म्हाडाच्या २६५ घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. यावेळेस अनेक जणांना लॉटरी लागली होती. मात्र यातील ७० जणांनी दीड वर्षानंतरही घराचा ताबा घेतलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर घराचा हक्क रद्द करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील विजेत्यांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने २०२३ मध्ये २६५ घरांसाठी लॉटरी काढली होती. त्यापैकी जवळपास ७० लोकांनी दीड वर्षानंतरही घराचा ताबा घेतलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पाठवलेल्या करणे दाखवा नोटीसलाही प्रतिसाद त्यांनी दिलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर घराचा हक्क रद्द करण्याची एकतर्फी कारवाई करण्याच्या म्हाडाने हालचाली सुरू केल्या आहेत.
उपकरप्राप्त (सेस) जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतीची जागा कमी असल्याने किंवा सदरचा भूखंड पालिकेच्या आरक्षणामुळे बाधित झाला असेल, रस्त्यात गेला असेल, तर त्यावर नव्याने इमारत उभारता येत नाही. त्यामळे अशा इमारतीमधील रहिवाशांचा म्हाडाकडून मास्टर लिस्टमध्ये समाविष्ट केला जातो. त्यांना इतरत्र पुनर्रचित इमारतीमधील अतिरिक्त सदनिका मालकी तत्त्वावर दिल्या जातात.
म्हाडाने २०२३ मध्ये २६५ रहिवाशांना घरे देण्यासाठी ऑनलाइन लॉटरी काढली होती. संबंधितांनी म्हाडाला स्वीकृती पत्र देऊन ४५ दिवसात घर स्वीकारने बंधनकारक आहे. म्हाडाने स्वीकृती पत्राच्या आधारे १७२ जणांना देकार पत्र दिले आहे. केवळ ९३ जणांनी ताबा घेतला असून, ७० जण घराचा ताबा घेण्यास पुढे आलेले नव्हते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.