मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी मनसे-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यानंतर आता महायुतीकडून आज जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रिपाईचे नेते रामदास आठवले आणि महायुतीमधील घटक पक्षांनी एकत्र येत आज जाहीरनामा प्रसिद्ध केला.
या जाहीरनाम्यात मुंबईकरांसाठी अनेक घोषणांचा पाऊस पाडण्यात आला. मुंबईतील लाडक्या बहिणींना लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, महिलांना बेस्ट प्रवासात ५० टक्के सूट, पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार या सारख्या अनेक घोषणा महायुतीकडून करण्यात आल्या. या जाहीरनाम्यात मुंबईकरांना नेमकी काय आश्वासनं देण्यात आली आहेत त्यावर आपण नजर टाकूया...
- मुंबईला पाणीपुरवठा वाढवण्यासाठी पुढील ५ वर्षात गारगाई, पिंजाळ, दमणगंगा प्रकल्प पूर्ण करणार
- पर्यावरण संवर्धन योजनेमार्फत १७ हजार कोटी रुपये
- बीएमसी मार्केटमध्ये मासळी विक्रेत्यांसाठी कोल्ड स्टोरेज उभारणार
- सर्व भाजी मंडईचे नुतनीकरण आणि पुर्नविकास करणार
- फिश इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट सेंटर स्थापन करण्यात येणार
- लघु उद्योग धोरण राबवले जाणार
- पुर्नविकासाला जलदगती देणार, पागडीमुक्त मुंबई आणि फनेल झोनप्रश्नी जाहीर केलेली योजना जलदगतीने राबविणार
- बेस्टमध्ये २०२९ पर्यंत पूर्णपणे इलेक्ट्रिक बसेस
- बेस्टमध्ये महिलांना ५० टक्के सवलत
- बेस्ट बसेसची संख्या ५ हजारवरुन १० हजारांवर जाणार
- स्टार्टअप इनक्युबेशन सेंटरची उभारणी करणार
- लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर करण्यासाठी आण लघु उद्योग स्थापन करण्यासाठी ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज
- रोहिंग्या व बांगलादेशी मुक्त मुंबई करणार
- पालिकेत स्वतंत्र मराठी भाषा विभागाची स्थापना करणार
- मराठी कला केंद्र आणि अभ्यासिकेची उभारणी करणार
- बाळासाहेब ठाकरे जन्मशताब्दीनिमित्ताने मराठी तरुणांसाठी विशेष कार्यक्रम आणि आर्थिक तरतूद राबवली जाणार
- पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन विभागाची स्थापना करणार
- हुतात्मा स्मारक चौकात जागतिक दर्जाचं संग्रहालय उभारणार
- रविंद्र नाट्य मंदिराच्या धर्तीवर अन्य नाट्यगृहांचा पुर्नविकास करणार आणि गरज पडल्यास ३ नवीन नाट्यगृहे उभारणार
- विकसित मुंबईसाठी २०३४ चा आराखडा तयार होणार
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.