

लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची बातमी
केवायसीची मुदत संपली
अजूनही या महिलांना करता येणार केवायसी
लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना केवायसी करणे अनिवार्य केले आहेत. केवायसी करण्याची मुदत ही ३१ डिसेंबर २०२५ होती. आता शेवटची तारीख उलटून गेली आहे. त्यानंतर आता उरलेल्या महिलांना केवायसी करता येणार नाहीये. जर केवायसी केले नाही तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. दरम्यान, या योजनेत काही महिलांना अजूनही केवायसी करता येणार आहे.
मुदत संपली तरी या महिलांना केवायसी करता येणार (Ladki Bahin Yojana KYC)
लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्याची शेवटची तारीख उलटून गेली आहे. तरीही अजून ४५ लाख महिलांनी केवायसी केले नाही. दरम्यान, आता केवायसीची वेबसाइटदेखील बंद झाली आहे. आता फक्त ज्या महिलांना पती किंवा वडील नाहीत, अशा महिलांचे केवायसी सुरु आहे. अंगणवाडी सेविकांकडे जे कागदपत्र आले त्यानुसार प्रोसेस सुरु आहे. या कागदपत्रांवरुन जिल्हा महिला बालविकास अधिकारी त्यांच्या लॉगिनवरुन लाभार्थींची माहिती भरत आहेत.
४५ लाख महिलांचे केवायसी बाकी (Ladki Bahin Yojana 45 Lakh Women KYC Still not Done)
लाडकी बहीण योजनेत जवळपास अडीच कोटी महिला लाभ घेत आहेत. या योजनेतील कोट्यवधी महिलांनी मुदतीपूर्वी केवायसी केले आहे. परंतु अजूनही ४५ लाख महिलांचे केवायसी बाकी आहे. केवायसी न केलेल्या महिलांना आता लाभ मिळणार आहे. याचसोबत केवायसी करण्यासाठी मुदतवाढ मिळणार का असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, अजूनही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.