Ladki Bahin: मुंबईतल्या लाडकींना ठाकरे बंधुंकडून १५०० रुपयांचे वचन, नेमकी काय असणार योजना?

BMC Election 2026: मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंनी आज वचननामा जाहीर केला. यामध्ये ठाकरे बंधूंनी मुंबईतील लाडक्या बहिणींना १५०० रुपये देण्याचे वचन दिले आहे. कुणाला या योजनाचा लाभ मिळणार ते वाचा...
Ladki Bahin: मुंबईतल्या लाडकींना ठाकरे बंधुंकडून १५०० रुपयांचे वचन, नेमकी काय असणार योजना?
Ladli Bahina YojanaSaam tv
Published On

Summary -

  • ठाकरे बंधूंनी मुंबईतील लाडक्या बहिणींसाठी १५०० रुपयांचे आश्वासन दिले

  • घरकाम करणाऱ्या महिलांना दर महिन्याला ‘स्वाभिमान निधी’ मिळणार

  • मोफत वीज, मोफत बेस्ट बस प्रवास आणि १० रुपयांत जेवणाचे वचन ठाकरे बंधूंनी दिले

  • मुंबई महापालिका निवडणुकीत महिला कल्याण हा प्रमुख मुद्दा असणार आहे

महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला टक्कर देणारे आश्वासन ठाकरे बंधूंनी आपल्या जाहीरनाम्यामध्ये मुंबईतील लाडक्या बहिणींना दिले आहे. मुंबईमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना ठाकरे बंधुंनी १५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. यासाठी घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी करून नोंदणीकृत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये स्वाभिमान निधी दिला जाईल असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आज ठाकरे बंधूंनी संयुक्त पत्रकार परिषद घेत मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी वचननामा जाहीर केला. या वचननाम्यामध्ये मुंबईकरांसाठी शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी यासह अनेक गोष्टींची वचन दिली आहेत. मुंबईकरांना १० रुपयांत जेवण आणि नाश्ता, २४ तास पाणी दिले जाईल असे आश्वासन ठाकरे बंधूंनी दिली. नोकरदार पालक तसेच कष्टकरी महिलांच्या मुलांना सांभाळणारी पाळणाघरे तयार केली जातील.

Ladki Bahin: मुंबईतल्या लाडकींना ठाकरे बंधुंकडून १५०० रुपयांचे वचन, नेमकी काय असणार योजना?
Thackeray Brothers Vachannama: मुंबईकरांसाठी 'शब्द ठाकरेंचा', शिवसेना-मनसेच्या वचननाम्यातील १० महत्वाची आश्वासनं कोणती?

मुंबईत पाळीव प्राण्यांसाठी दवाखाना, ७०० चौरस फुटांपर्यत मालमत्ता कर माफ, घरगुती वीज वापर करणाऱ्या ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणार, मुंबई महापालिकेचं स्वतःचं सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय असेल, बाळासाहेबांच्या नावाने मुंबईत एक कला महाविद्यालय सुरु केलं जाईल याठिकाणी उपयोजित कला, फाईन आर्ट्स, सिनेमा तंत्र यांचं शिक्षण दिले जाईल असे आश्वासन ठाकरे बंधूंनी वचननाम्यात दिले.

Ladki Bahin: मुंबईतल्या लाडकींना ठाकरे बंधुंकडून १५०० रुपयांचे वचन, नेमकी काय असणार योजना?
BMC Election : मुंबईत राज ठाकरेंना ऐनवेळी धक्का; मनसेच्या ११ निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मुंबईत महिला आणि विध्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास दिला जाईल, महापालिकेच्या पार्किंगमध्ये मोफत पार्किंग व्यवस्था दिली जाईल, मुंबईतील नालेसफाई १२ महिने प्रक्रिया राबवण्यात येईल, मुंबईतील नागरिकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत दिली जाईल, बाळासाहेब ठाकरे स्वयं रोजगार अर्थसाह्य योजना सुरू केली जाईल, असे देखील या वचननाम्यात आश्वासन दिले गेले आहे.

Ladki Bahin: मुंबईतल्या लाडकींना ठाकरे बंधुंकडून १५०० रुपयांचे वचन, नेमकी काय असणार योजना?
BMC Election : CM फडणवीस अन् शिंदेंची तोफ ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात धडकणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com