महापलिका निवडणुकीसाठी सगळेच पक्ष आता प्रचाराचा धडाका सुरू करणार आहे. भाजपने आघाडी घेत आजपासून सांगलीमधून प्रचाराचा नारळ फोडला.स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्राचराचा शुभारंभ करत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यंदाच्या निवडणुकीत महायुतीला ठाकरे बंधुचे मोठे आव्हान आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिका ही गेली 25 वर्ष ठाकरेंकडे असल्याने यंदा ठाकरे गटाला देखील आपला गड राखायचा आहे. विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाल्यानंतर आता आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी ठाकरे बंधु एकत्र आले आहे.
सर्वच पक्षांनी आता स्टार प्रचाराची यादी जाहीर केली आहे. काही दिवसांपूर्वीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदार नीलेश राणे यांना मुंबईत प्रचारात उतरवणार असल्याचे सांगितले होते. तर दुसरीकडे भाजपने उत्तरभारतीयांना आकर्षित करण्यासाठी थेट उतरप्रदेशचे योगी आदित्यनाथ, रवी किशन आणि मनोज तिवारी यांना प्रचारात उतरवणार आहे. अशातच आता शिंदेनी एक ग्रामीण भागातील चेहरा प्रचारासाठी उतरवला आहे. काय झाडी, काय डोंगर या डायलॉगने आख्या महाराष्ट्रात मशहुर झालेले व्यक्तिमत्व ते म्हणजे सांगोलाचे माजी आमदार शहाजी बापु पाटील.
मुंबई महानगर पालिका निवडणुकीत सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार तथा काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापू पाटील यांची 5 जानेवारीपासून भाजप-शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी तोफ धडाडणार आहे. मुंबई शहरातील विविध भागात शहाजी बापू पाटील प्रचार सभा,पदयात्रा आणि गाठीभेटी घेऊन प्रचार करणार आहेत. शिवसेनेच्या वतीने त्यांच्या प्रचार सभांचे आयोजन केले गेले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील हजारो लोक मुंबईत वास्तव्यास आहेत. त्यामुळे शहाजी बापू पाटील हे या भागात जाऊन प्रचार करणार आहेत. रांगडे व्यक्तीमत्व अशी ओळख असलेल्या शहाजी बापू पाटील हे मुंबई महानगर पालिका निवडणुकीत प्राचारात काय बोलतात याकडेच लक्ष लागले आहे.
मुंबई महानगर पालिकेच्या प्रचारामध्ये संजय राऊत यांना पालापाचोळ्या सारखं उडवून लावतो. दरम्यान मुंबई महानगर पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू तेच तेच मुद्दे मांडत आहेत. परंतु ते सगळे मुद्दे कालबाह्य झाले आहेत. मुंबईमध्ये यावेळी सत्तांतर अटळ असल्याचा दावा ही शहाजी बापू पाटील यांनी केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.