शिंदेसेनेच्या नेत्याचा लेटरबॉम्ब, पत्नीसह आत्महत्येचा इशारा, पत्रात 'या' बड्या नेत्यांची नावे

ShindeSena Leader Suicide Threat Nashik: नाशिकमध्ये शिंदेसेनेतील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. महापालिकेचे तिकीट न मिळाल्याने इच्छुक उमेदवाराने पत्नीसह आत्महत्येचा इशारा देत सोशल मीडियावर पत्र पोस्ट केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Political tension escalates in Nashik as a Shinde Sena aspirant posts a suicide threat letter naming senior leaders.
Political tension escalates in Nashik as a Shinde Sena aspirant posts a suicide threat letter naming senior leaders.Saam Tv
Published On

महापालिकेचे तिकीट न मिळाल्याने राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. निष्ठवंतांना डावलून उपऱ्यांच्या घरात दोन ते तीन उमेदवार दिल्याने कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळून आला होता. विशेषतः सांभाजीनगर आणि नाशिकमध्ये हायव्होलटेज ड्रामा पाहायला मिळाला. बी फॉर्मसाठी शहरअध्यक्षांचा राजीनामा ते फार्म हाऊसच्या गेट तोडणे असा सगळा प्रकार राज्यातील जनतेने बघितला आणि निरनिराळया प्रतिक्रिया देत कोणी हसले तर कोणी यावर संताप व्यक्त केला. भाजपमध्ये उफाळून आलेल्या वादानंतर आता शिंदेगटाचा भयावह प्रकार समोर आला आहे.

Political tension escalates in Nashik as a Shinde Sena aspirant posts a suicide threat letter naming senior leaders.
विरोधक राहिले बाजूला! भाजप, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेनेत पेटली वादाची ठिणगी

नाशिकमधील शिंदे गटाचा वाद बाहेर आला असून इच्छुक उमेदवाराने पत्नीसह आत्महत्येचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील प्रभाग क्रमांक 31 मध्ये इच्छुक उमेदवार शिवा तेलंग यांनी आपल्या पत्नीसह जीवन संपवण्याचा इशारा दिला आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पत्र पोस्ट करत आत्महत्येचा इशारा दिला आहे. आपल्या आत्महत्येला अजय बोरस्ते, हेमंत गोडसे, विजय करंजकर, सुदाम ढेमसे हे जबाबदार राहतील असे पत्रात म्हटले आहे.

Political tension escalates in Nashik as a Shinde Sena aspirant posts a suicide threat letter naming senior leaders.
आम्ही बोललो तर तुमची अडचण होईल, Ravindra Chavan यांचा Ajit Pawar यांना इशारा

महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी पैशांची देवाणघेवाण करून तिकीट वाटल्याचा आरोप केला आहे. पक्षाकडून प्रभागात दोन जणांना AB फॉर्म देण्यात आल्याने हा प्रकार घडला आहे. हे पत्र शिवा तेलंग यांनी पोस्ट केल्यानंतर ते नॉट रिचेबल आहे.

Political tension escalates in Nashik as a Shinde Sena aspirant posts a suicide threat letter naming senior leaders.
Pune : मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या मुलावर गुन्हा दाखल, मध्यरात्री हायव्होल्टेज ड्रामा, भाजपकडून तक्रार अन्....

पत्रात नेमके काय?

सर्व विषय मी तुम्हाला सर्वांना सांगतो आहे. माझ्या आत्महत्येला हे सर्व जबाबदार राहतील. मी खाली पुन्हा एकदा सर्वांचे नाव देत आहे. कृपया आपण याचे सर्वांनी नोंद घ्यावी आणि मी उद्या तुमच्यामध्ये नसणार आहे. त्यामुळे माझ्या पत्नीला आणि मुलाबाळांना न्याय मिळवून देण्यात यावा ही आपणास सर्व नागरिकांना विनंती आहे. माझ्या आत्महत्येला सर्वे कारणीभूत असणाऱ्यांची नावे एक नंबर आरोपी सुदाम ढेमसे राहणार आहे. विजय करंजकर, हेमंत गोडसे, अनिल गायकवाड, अमोल जाधव, रवी गामने, अजय पाटील, अजय बोरस्ते या नेत्यांची नावे या पत्रांमध्ये नावे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com