५ जानेवारीपासून मेट्रो लाईन ३ वर अतिरिक्त गाड्या चालवण्यात येणार
सोमवार ते शुक्रवार आणि शनिवारी फेऱ्या वाढवल्या
रविवारचे वेळापत्रक बदलण्यात येणार नाही
मेट्रो सेवा वाढल्याने सीएसएमटी परिसरातील गर्दीत घट
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई मेट्रोच्या ३, अॅक्वा लाईन मार्गिकेवर सोमवार म्हणजेच ५ जानेवारीपासून अतिरिक्त रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केली आहे. एमएमआरसीने म्हटले आहे की, वाढती गर्दी पाहता उत्तर आणि दक्षिण मुंबईला जोडणारी मेट्रो लाईन ३ वर अधिक गाड्या चालवण्यात येतील. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील आणि उपनगरीय रेल्वेवरील कनेक्टिव्हिटी आणि ताण कमी होईल.
एमएमआरसीच्या अधिसूचनेनुसार, सोमवार ते शुक्रवार पर्यंत, पूर्वीच्या दिवसाच्या फेऱ्या २६५ वरून २९२ पर्यंत वाढवण्यात येतील. शनिवारी २०९ फेऱ्यांवरून २३६ दररोज फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. एमएमआरसीने असेही म्हटले आहे की रविवारच्या वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसून नेमीप्रमाणे १९८ गाड्यांच्या फेऱ्या चालवल्या जातील. "प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी वरील बदलांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार त्यांच्या प्रवासाचे नियोजन करावे," असे एमएमआरसीने म्हटले आहे.
पूर्णपणे भूमिगत मेट्रो लाईन ३ ही पश्चिम उपनगरातील आरे JVLRला बीकेसी मार्गे दक्षिण मुंबईतील कफ परेडशी जोडते. ज्यामध्ये प्रमुख व्यावसायिक आणि प्रशासकीय केंद्रे समाविष्ट आहेत. ३३.५ किमी लांबीच्या या कॉरिडॉरमध्ये २७ स्थानके आहेत, जी आरे जेव्हीएलआर वगळता सर्व भूमिगत आहेत. पहिली ट्रेन आरे जेव्हीएलआर आणि कफ परेड येथून सकाळी ५.५५ वाजता निघते आणि शेवटची ट्रेन रात्री १०.३० वाजता सुटते. अधिकृत आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये मेट्रो लाईनवर एकूण ३८.६३ लाख प्रवाशांची संख्या नोंदवली गेली होती, ज्याची एकूण सरासरी १,४१,०२४ होती.
गेल्या वर्षी केलेल्या वाहतूक पोलिसांच्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की मेट्रो सुरू झाल्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील गर्दीत ३० टक्क्यांनी घट झाली आहे. शिवाय, सर्वेक्षणात बेस्ट बस आणि शेअर टॅक्सी वापरणाऱ्या प्रवाशांच्या संख्येतही घट झाल्याचे दिसून आले आहे. ज्यामुळे दैनंदिन प्रवासासाठी मेट्रो प्रवासाकडे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. सर्वेक्षणात असे आढळून आले की, सीएसएमटी आणि जवळच्या स्थानकांवरून दररोज सुमारे ४५,००० लोक मेट्रो लाईन ३ वापरतात. पूर्वी सीएसएमटी परिसरात जेजे फ्लायओव्हर, महापालिका मार्ग, हजारीमल सोमाणी मार्ग आणि डीएन रोड सारख्या मार्गांवरून जड वाहनांची वाहतूक होत असे, विशेषतः गर्दीच्या वेळी. मात्र मेट्रो ३ लाईन सुरु झाल्यापासून त्यात लक्षणीय सुधारणा दिसून आली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.