Thackeray Brothers Vachannama: मुंबईकरांसाठी 'शब्द ठाकरेंचा', शिवसेना-मनसेच्या वचननाम्यातील १० महत्वाची आश्वासनं कोणती?

BMC Election 2026: मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेत वचननामा जाहीर केला. यामध्ये त्यांनी मुंबईकरांना नेमकी काय आश्वासने दिली वाचा सविस्तर...
Thackeray Brothers Vachannama: मुंबईकरांसाठी 'शब्द ठाकरेंचा', शिवसेना-मनसेच्या वचननाम्यातील १० महत्वाची आश्वासनं कोणती?
Thackeray Brothers VachannamaSaam Tv
Published On

Summary -

  • ठाकरे बंधूंनी मुंबईसाठी संयुक्त वचननामा जाहीर केला

  • आरोग्य, पाणीपुरवठा, वाहतूक आणि सांस्कृतिक विकासावर भर देणार

  • महिलां आणि विद्यार्थ्यांसाठी बेस्ट बस मोफत प्रवासाचे आश्वासन

  • मुंबईकरांना मोफत पाणी देण्याचे आश्वासन

मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज एकत्र येत वचननामा जाहीर केला. मनसे, शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या शिवशक्तीचा वचननामा आज प्रसिद्ध झाला. ठाकरे बंधूंनी दादर येथील शिवसेना भवनमध्ये एकत्रित पत्रकार परिषद घेत 'शब्द ठाकरेंचा' हा वचननामा जाहीर केला. या वचननाम्यामध्ये मुंबईकरांसाठी नेमकी काय आश्वासने देण्यात आली आहेत ती आपण पाहणार आहोत...

ठाकरे बंधूंनी वचननाम्यात काय आश्वासनं दिली?

- मुंबईचं 'मुंबईपण' अधोरेखित करण्यासाठी एस्थेटिक सेन्स पाळला जाईल आणि मुंबईच कॅरेक्टर जपलं जाईल.

- मुंबई महापालिकेतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने या देशातील सर्वात मोठं ग्रंथालय उभारलं जाईल.

- छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील संयुक्त महाराष्ट्र स्मृती दालनाचे नूतनीकरण करणार.

- देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मुंबई आणि महाराष्ट्राचे योगदान अधोरेखित करणारे स्वातंत्र्यसमर स्मृतीदालन उभारणार.

- मुंबईला घडवण्यात मोलाचा वाटा असलेल्या उद्योजकांच्या योगदानाचे दर्शन घडवणारे अत्याधुनिक मुंबई म्युझियम उभारणार.

- स्व. बाळासाहेबांच्या नावाने मुंबईत एक कला महाविद्यालय सुरु केलं जाईल. जिथे उपयोजित कला, फाईन आर्ट्स, सिनेमा तंत्र यांचं शिक्षण मिळेल

- मुंबई महापालिका २०३१ पर्यंत १० नवीन मध्यम व छोट्या आकाराची नाट्यगृहं आणि कलादालने उभारेल.

- प्रत्येक वॉर्डात मिनी फायर ब्रिगेड आणि फायर फायटिंग मोटरसायकल्स उपलब्ध असतील.

- हॅझमॅट रिस्पॉन्स वेहिकल आणि ऑल टेरेन ऑल पर्पज वेहिकल उपलब्ध करणार.

- मुंबईतील रूग्णांचा भार समर्थपणे पेलण्यासाठी आणि आरोग्य सेवांचा विस्तार करण्यासाठी मुंबईत आणखी पाच वैद्यकीय महाविद्यालयं सुरू करणार.

- पालिका रूग्णालयांतील ओपीडी क्षमता दुप्पट करणार.

- महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे रोबोटिक ऑपरेशन थिएटर तसंच डिजिटल सब्स्ट्रॅक्शन एंजिओग्राफी / जलद रिकव्हरीसाठी लॅप्रोस्कोपी सर्जरी सुरु करणार.

- केंद्र व राज्य सरकार मान्यताप्राप्त जेनेरिक मेडिसिन दुकानांमध्ये पालिका रुग्णालयातील तसंच दवाखान्यातील डॉक्टरांनी प्रीस्क्रिप्शन दिलेल्या रुग्णांना जेनेरिक औषधे मोफत उपलब्ध करुन देणार.

Thackeray Brothers Vachannama: मुंबईकरांसाठी 'शब्द ठाकरेंचा', शिवसेना-मनसेच्या वचननाम्यातील १० महत्वाची आश्वासनं कोणती?
BMC Election: मुंबईत शिंदेसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह २०० पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

- ज्येष्ठ नागरिकांसाठी २४४७ हेल्थ केअर कंट्रोल रूम आणि आरोग्यसेवा आपल्या दारी (हेल्थ-टू-होम) या सेवा सुरू करणार.

- महापालिका स्वतःच्या मालकीची रूग्णवाहिका आणि शववाहिनी सेवा सुरू करणार.

- मुंबई महापालिकेचं स्वतःचं सुपर स्पेशालिटी कॅन्सर रुग्णालय असेल

- मलनिःसारण वाहिन्यांची व्याप्ती वाढवणार: २०१७ मध्ये ही क्षमता व्याप्ती ५६ टक्के होती. आता ८६ टक्के आहे. पुढील ५ वर्षात १०० टक्के पूर्ण करणार.

- समुद्राचे पाणी गोड्या पाण्यात रुपांतरीत करणारा निःक्षारीकरण (डिसॅलिनेशन) प्रकल्प राबवून मुंबईकरांना सध्याच्या दरानेच मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणार.

- पाण्यावर प्रक्रिया करणारे मलः निसारण प्रकल्प (सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट) वेळेत पूर्ण करणार, हे पाणी अन्य कामांसाठी वापरणार.

- सफाईची कामं ही वर्षाची १२ महिने केली जातील आणि पुढील ५ वर्षांत नाल्यांवर संरक्षक जाळी बसवली जाईल.

- पाण्याचे दर स्थिर ठेवून मुंबईकरांना, मग तो टॉवरमध्ये राहणारा असो की वस्ती- पाड्यात, प्रत्येकाला स्वच्छ आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणारच.

- तिकीट दरवाढ कमी करून रूपये ५-१०-१५-२० फ्लॅट रेट ठेवणार.

- बेस्टच्या ताफ्यात १०,००० ईलेक्ट्रिक बस तसंच २०० डबल डेकर ईलेक्ट्रिक बसचा समावेश करणार.

- महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विशेष बेस्ट बसमध्ये मोफत प्रवास.

Thackeray Brothers Vachannama: मुंबईकरांसाठी 'शब्द ठाकरेंचा', शिवसेना-मनसेच्या वचननाम्यातील १० महत्वाची आश्वासनं कोणती?
BMC Election : मुंबईत राज ठाकरेंना ऐनवेळी धक्का; मनसेच्या ११ निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

- घरगुती वीज वापर करणाऱ्या 'बेस्ट विद्युत' च्या ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणार.

- बीपीटीच्या सुमारे १,८०० एकरच्या जमिनीवर आंतरराष्ट्रीय उद्योजकता आणि वित्तीय केंद्र तसंच सागरी पर्यटन केंद्र उभारणार.

- मुंबईचा कोस्टल रोड आणि पूर्व किनारपट्टी यांना जोडणाऱ्या रस्त्यांचं जाळं निर्माण करून मुंबईभोवती मास रॅपिड मोबिलिटीसाठी रिंगरोड ग्रिड उभारणार.

- मुंबईतील सध्याचे विकास प्रकल्प निश्चित कालावधीत पूर्ण करून अनावश्यक खोदकाम रोखणार.

- बेस्ट कर्मचा-यांचे वेतन, पीएफ आणि ग्रॅच्युइटीच्या समस्या तातडीने मार्गी लावणार.

- मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूककोंडीचे २०० स्पॉट्स निश्चित करून तिथे टॅक्टिकल अर्बनिजम- सिव्हिक डिझाइनच्या माध्यमातून प्रभावी उपाययोजना आखणार. महापालिकेच्या वाहनतळांमध्ये पार्किंग सुविधा मोफत करणार.

- मुंबईत आयोजित म्युझिक कॉन्सर्ट आणि आयपीएल सामन्यांसाठी खास 'मुंबईकर स्टैंड' मध्ये एक टक्का आसने १८ ते २१ वयोगटातील युवा मुंबईकरांसाठी लॉटरीद्वारे मोफत देणार.

Thackeray Brothers Vachannama: मुंबईकरांसाठी 'शब्द ठाकरेंचा', शिवसेना-मनसेच्या वचननाम्यातील १० महत्वाची आश्वासनं कोणती?
BMC Election : CM फडणवीस अन् शिंदेंची तोफ ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात धडकणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com