Nashik Politics: नाशिकमध्ये राज ठाकरेंना धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचे 'कमळ' घेणार हाती

Raj Thackeray: नाशिकमध्ये मनसेला मोठा धक्का बसला आहे. मनसेच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली असून त्या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. एबी फॉर्म देऊनही सुजाता डेरे यांनी माघार घेतली होती.
Nashik Politics: नाशिकमध्ये राज ठाकरेंना धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचे 'कमळ' घेणार हाती
Raj ThackeraySaam Tv
Published On

Summary -

  • नाशिकमध्ये मनसेच्या बड्या महिला नेत्या सुजाता डेरे यांचा राजीनामा

  • सुजाता डेरे आज भाजपमध्ये प्रवेश करणार

  • एबी फॉर्म देऊन देखील घेतली माघार

  • पालिका निवडणुकीआधी मनसेसाठी मोठा धक्का

नाशिक महानगर पालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मोठी राजकीय घडामोड घडली. नाशिकमध्ये एबी फॉर्म देण्यावरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये नाराजीनाट्य पाहायला मिळाले. एबी फॉर्म न मिळाल्यामुळे नाराज होत अनेक बड्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी करत पक्षाची साथ सोडली. अशात नाशिकमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना धक्का बसला आहे. मनसेच्या बड्या महिला नेत्याने पक्षाची साथ सोडली असून त्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे पालिका निवडणुकीदरम्यान नाशिकमध्ये मनसेसाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा होत आहे.

Nashik Politics: नाशिकमध्ये राज ठाकरेंना धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचे 'कमळ' घेणार हाती
Raj Thackeray : महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी, राज ठाकरेंनी भाजपचा शेलक्या शब्दात घेतला समाचार, वाचा नेमकं काय म्हणाले

नाशिकमध्ये मनसेच्या माजी नगरसेविका सुजाता डेरे यांनी पक्षाला जय महाराष्ट्र केला. सुजाता डेरे या लवकरच भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत. सुजाता डेरे यांनी नाशिकमधून मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पक्षाने एबी फॉर्म देऊनही सुजाता डेरे यांनी माघार घेतली होती. त्यांनी अचानक माघार का घेतली? याबाबत नाशिकच्या राजकीय वर्तुळात संभ्रम सुरू आहे. मात्र आज सुजाता डेरे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा मनसेसाठी मोठा धक्का आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत सुजाता डेरे भाजपचे कमळ हाती घेणार आहे.

Nashik Politics: नाशिकमध्ये राज ठाकरेंना धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचे 'कमळ' घेणार हाती
Shiv Sena MNS alliance : "कोण किती जागा लढवणार, आकडा काय?" राज ठाकरेंनी भाजपला चिमटा काढला

तर दुसरीकडे, भाजप बंडखोरांविरोधात अॅक्शन मोडमध्ये आले आहे. भाजपने बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने बंडखोरांविरुद्ध कठोर पाऊल उचललंय. बंडखोरी करणाऱ्या ७ पदाधिकाऱ्यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली. अर्जुन म्हात्रे, विनिता म्हात्रे आणि नवनाथ पाटील यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी ही कारवाई केली.

Nashik Politics: नाशिकमध्ये राज ठाकरेंना धक्का, बड्या महिला नेत्याने सोडली साथ; भाजपचे 'कमळ' घेणार हाती
Pune BJP Candidate List: नातेवाईकांना डावललं, निष्ठावंतांना संधी; पुण्यात भाजपने कुणाला दिली संधी?, वाचा उमेदवारांची संपूर्ण यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com