Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला गोव्याला फिरायला जायला वेळ मिळत नसेल तर तुम्ही जवळच्या सुंदर ठिकाणाला भेट देऊ शकता.
अलिबागमधील निळेशार समुद्र, पांढरी वाळू आणि नारळी-पोफळीची झाडं यामुळे इथे गोव्यासारखा अनुभव मिळतो.
मुंबई आणि पुण्याच्या मधोमध असलेलं अलिबाग एक डे ट्रिप किंवा वीकेंड ट्रिपसाठी उत्तम ठिकाण आहे.
समुद्राच्या मध्यभागी असलेला मुरुड जंजिरा किल्ला जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो.
मुरुड जंजिरा, पद्मदुर्ग, खंदेरी-उंदेरी आणि कुलाबा किल्ला अशी अनेक ऐतिहासिक ठिकाणं इथे पाहायला मिळतात.
काशीद, मांडवा, किहिम आणि नागाव हे अलिबागमधील प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत.
या समुद्रकिनाऱ्यांवर जेट स्की, पॅरासेलिंग, बनाना राईड यांसारखे वॉटर स्पोर्ट्स अनुभवता येतात.
सणासुदीच्या काळात अलिबागला मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.
निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि शांत वातावरण यामुळे अलिबाग हे कुटुंब, मित्र किंवा कपल्ससाठी परफेक्ट पर्यटनस्थळ आहे.