Sakshi Sunil Jadhav
घरात ओले हरभरे असतील तर मुलांना मस्त चवदार भजी तळून तुम्ही देऊ शकता. पुढे याची सोपी रेसिपी दिली आहे.
तीन वाट्या सोलाणे (ओले हरभरे), ५ ते ६ हिरव्या मिरच्या, मीठ, १ बारिक चिरलेला कांदा, कोथिंबीर, तेल, ३ ते ४ चमचे बेसन इ.
हरभरे वापरण्यापूर्वी ते व्यवस्थित धुवून घ्यावेत, जेणेकरून माती किंवा घाण राहणार नाही.
हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतल्यास भज्यांना चव आणि सुगंध मिळतो.
वाटलेल्या मिश्रणात बेसन, बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून नीट मिक्स करा.
ओले हरभरे असल्यामुळे मिश्रण फार घट्ट किंवा पातळ होऊ देऊ नये, गरज असल्यास थोडेच पाणी वापरा.
तेल चांगले गरम झाल्यावर मध्यम आचेवर भजी सोनेरी होईपर्यंत तळावीत.
तुम्ही ही भजी हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा गरम चहासोबत खाल्ल्यास चव वाढेल.