Shiv Sena announces 21-member committee for BMC elections under Shinde’s leadership  saam tv
मुंबई/पुणे

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Shiv Sena 21 Member Committee : २०२५ च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांपूर्वी मिशन बीएमसी मोहिमेचे नेतृत्व करण्यासाठी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने २१ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. पक्षाने आपली जोरदार राजकीय तयारी सुरू केली आहे.

Bharat Jadhav

  • बीएमसी निवडणुकीसाठी शिवसेनेची जोरदार तयारी सुरू.

  • शिंदे गटानं २१ सदस्यांची मुख्य समिती स्थापन केली.

  • महायुतीला टक्कर देण्यासाठी मोठा प्लॅन आखण्यात आला

राज्यातील स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच लागणार आहेत. त्यादृष्टीनं सर्व राजकीय कामला लागले आहेत. पक्ष प्रवेशाचे कार्यक्रम राबवले जात आहेत. तर दुसरीकडे महायुतीला जोरदार धोबीपछाड देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी रणनिती तयार करण्यास सुरुवात केलीय. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे गट शिवसेनेनं मोठा प्लॅन आखलाय. शिवसेने २१ सदस्यांची समिती तयार करत निवडणुकीवर काम काम सुरू केलंय.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने कंबर कसली आहे. निवडणुकीचा सारा भार संभाळण्यासाठी आणि महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी पक्षाने पक्षाची मुख्य कार्यकारी समिती तयार केलीय. यात पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासह २१ शिलेदारांचा समावेश करण्यात आलाय.

आगामी महापालिका निवडणुकीबाबत पक्षाच्या पातळीवरील सर्व महत्त्वाचे निर्णय ही समिती घेणार आहेत. शिवसेनेचे प्रमुख नेते, खासदार, माजी खासदार, आमदार, माजी आमदार यांना यात संधी देण्यात आली आहे. एकूण२१ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे.

शिवसेनेची मुख्य कार्यकारी समिती

१) एकनाथ शिंदे, मुख्य नेते

२) रामदास कदम, नेते

३) गजानन कीर्तीकर, नेते

४) आनंदराव अडसूळ, नेते

५) मीनाताई कांबळे, नेत्या

६) डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार

७) रवींद्र वायकर, खासदार

८) मिलिंद देवरा, राज्यसभा - खासदार

९) राहुल शेवाळे, माजी खासदार

१०) संजय निरुपम, माजी खासदार

११) प्रकाश सुर्वे, आमदार

१२) अशोक पाटील, आमदार

१३) मुरजी पटेल, आमदार

१४) दिलीप लांडे, आमदार

१५) तुकाराम काते, आमदार

१६) मंगेश कुडाळकर, आमदार

१७) श्रीमती मनिषा कायंदे, विधान परिषद, आमदार

१८) सदा सरवणकर, माजी आमदार

१९) यामिनी जाधव, माजी आमदार

२०) दीपक सावंत, माजी आमदार

२१) शिशिर शिंदे, माजी आमदार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT