दादर कबुतरखाना प्रकरणावरुन जैन समाजाचा संताप
जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा
जैन मुनी मुंबई मनपा निवडणुकीत उतरणार
Jain Munis Shantidoot Janakalyan Party : दादरमधील कबुतरखाना बंद केल्याने जैन समाजाने संताप व्यक्त केला आहे. यावरुन राजकारण पेटलं असताना जैन समाजाने मनपा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. जैन मुनींनी शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणा केली आहे. मनपा निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केली. दादरमध्ये कबूतर बचाओ धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या धर्मसभेदरम्यान जैन मुनींनी पत्रकार परिषद घेतली.
निलेश चंद्र मुनी म्हणाले, 'मी सरकारला इशारा दिला नाहीये. कबुतरांचा विषय सुरु आहे. आम्ही महाराष्ट्रातील मराठीला विरोध करत नाही. मनपा निवडणुकांमध्ये सुरु आहे, कुत्रा आणलं ते चाललं नाही, कबुतर आणणं चाललं नाही. मंगल प्रभात लोढा जैन समाजाचा नाही, मुंबई समाजाचा नेता आहे. त्यांच्याबद्दल मला काही बोलायचे नाही. त्यांचे कार्य ते करणार, मी माझं करणार. कोण ती ताई तिला मी ओळखत नाही. एकनाथ शिंदेंना सांगतो जे पागल झालेत, त्यांना सांगा. ठाण्यात सपोर्ट केला आहे. जैन समाज आनंद दिघेंना मान दिलाय. त्यांचे जे नेते कबुतरांना विरोध करतात त्यांना आवरा. कबुतरखाने सुरु केल्याबद्दल मी मंगल प्रभात लोढा यांचे आभार मानतो. मी कोणत्या पक्षाचा प्रचारक नाहीये.'
'ज्यांनी हा वाद सुरु केला, त्या ताई म्हणतात आम्ही नागाला दूध पाजणं बंद केलंय. तू नसेल पाजत तर तुझा प्रश्न आहे. आम्ही आमचा धर्म विसरणार नाही. जैन समाज शांती पूरक समाज आहे. हा समाज देशाला उन्नती करणारा समाज आहे. शिवसेनेचं चिन्ह सिंह आहे, आपल्याला दिसतो. बाळासाहेब यांच्या शिवसेनेचे चिन्ह आहे.'
'आम्ही आज शांतीदूत पक्षाची घोषणा करतोय. मारवाडी गुजराती एकत्र व्हा. बीएमसीमध्ये आमचे वाघ आम्ही उभे करु. येणाऱ्या वेळेत कबुतर कोणाला बुडवेल ते बघा. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आम्ही मानतो, बाकी कोणाला आम्ही ओळखत नाही. मंगल प्रभात लोढा हे फक्त आमच्या समाजाचे नाही तर संपूर्ण राज्याचे मंत्री आहेत. शांती दूत जणकल्याण पार्टी ही पशु पक्ष्यांसाठी लढणार आहे. दिवाळीपर्यंत अल्टीमेंटम दिलंय, महाराष्ट्र सरकारला आम्ही निवेदन देणार आहोत.'
'स्वामी समर्थांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला होता. संत कोणता प्रचार करत नाहीत, ते फक्त आशीर्वाद देऊ शकतात. बीएमसी निवडणुका येत आहेत, दादरचा कबुतरखाना खोला. त्यांच्या रक्षणासाठी काहीतरी ठोस पाऊले उचलली पाहिजे. आता जी कमिटी बनवली आहे. त्यावर आमचा विश्वास नाही. प्राण्यांपेक्षा माणसांचा जीव महत्त्वाचा आम्ही पण म्हणतोय. दारूमुळे डेंग्यू, मलेरियामुळे पण जीव जातोय. तुम्ही दारू, सिगारेटवर बंदी लावाल तर आम्ही पण बंदी करु.'
'कबुतरखाना जैन समाजाने खुले केले नाही. ते आधीपासूनच आहेत. कबुतरांसाठी मंदिराचे दरवाजे खुले आहेत. जे बिल्डर आहेत, त्यांना सांगा कबुतरखाना मंदिरावर बनवा. दरवाजे आमच्या प्रार्थनेसाठी बंद केले आहेत, म्हणून जाळी लावलेली आहे. राकेश भाऊ त्यांच्या फ्लॅटमध्ये कबुतर पाळतात. जर गरज पडली तर मी धर्मासाठी तलवार उचलणार. जे धर्माच्या नावाने नारे लगावतात गाईला कापतात त्याच्याविरुद्ध आम्ही कारवाई करू. कायद्यावर आम्हाला विश्वास आहे. गरज पडली तर धर्मासाठी आम्ही शस्त्र उचलणार, जे लोक अल्लाह हू अकबरचे नारे लावतात, त्यांच्यावर आम्ही कारवाई करू.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.