Mumbai news  saam tv
मुंबई/पुणे

Mumbai : शालेय विद्यार्थ्यांची मधुमेह तपासणी केलीच नाही; 'त्या' वृत्ताबाबत पालिकेचे स्पष्टीकरण

मुंबईतील मनपा शाळेतील १३ हजार विद्यार्थ्यांना मधुमेह आणि रक्तदाब या आजारांनी ग्रासल्याची माहिती चुकीची असल्याची बाब समोर आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

भूषण शिंदे

Mumbai News : मुंबईतील मनपा शाळेतील १३ हजार विद्यार्थ्यांना मधुमेह आणि रक्तदाब या आजारांनी ग्रासल्याची माहिती चुकीची असल्याची बाब समोर आली आहे. शालेय विद्यार्थ्यांची मधुमेह तपासणी मुंबई महानगर पालिकेने कधीही केली नसल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आली आहे. (Latest Marathi News)

मुंबईतील १३ हजार विद्यार्थ्यांना मधुमेह आणि रक्तदाब झाल्याची माहिती समोर आल्यामुळे पालकांच्या चिंतेत वाढ झाली होती. मात्र, आज, रविवारी १३ हजार विद्यार्थ्यांबाबतची बातमी चुकीची असल्याची माहिती समोर आल्यामुळे पालकांची चिंता दूर झाली आहे. शालेय विद्यार्थ्यांची मधुमेह तपासणी मुंबई महानगर पालिकेने कधीही केली नसल्याची माहिती मुंबई (Mumbai) महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली आहे.

मधुमेहाच्या तपासण्या या ३० वर्षांवरील व्यक्तींच्या केल्या जातात. सध्या 'माता सुरक्षित तर घर सुरक्षित' या संपूर्ण महाराष्ट्रात राबवल्या जाणाऱ्या अभियाना अंतर्गत अहवाल पालिकेकडून सादर करण्यात आला होता. त्यामुळे कदाचित प्रसार माध्यमांचा संभ्रम झाला असावा, असेही पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाविषयी पालिकेनी दिली महत्वाची माहिती

चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब सारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत आहे. मुंबईतही १८ ते ६९ वर्ष या वयोगटातील सुमारे अठरा टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर वर्ष २०२१ मध्ये वर्षभरात एकूण मृत्यू नोंदणीपैकी १४ टक्के मृत्यूचे कारण मधुमेह नोंदवण्यात आले आहे.

दरवर्षी, १४ नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. जागतिक मधुमेह दिन २०२१-२०२३ निमित्ताने मधुमेह देखभालीसाठी आरोग्य सेवांपर्यंत पोहोच ही संकल्पना जगभरात राबवली जात आहे. यंदा (२०२२) मध्ये देखील मधुमेह संदर्भातील गुणवत्तापूर्ण शिक्षण (Education) प्रसार करण्यावर लक्ष केंद्रित करून सर्वत्र अभियान राबविण्यात येत आहे.

Edited By - vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तृतीयपंथी समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय प्रतिनिधित्व मिळावे - मैत्री संघटना

Bank Jobs: महत्त्वाची बातमी! जिल्हा मध्यवर्ती बँकेत जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य; ७० टक्के जागा राखीव

मोठी बातमी! अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द, 'ते' वक्तव्य भोवलं|VIDEO

Dakshin Ganga: कोणत्या नदीला 'दक्षिण भारताची गंगा' म्हणतात? जाणून घ्या

हृदयद्रावक घटना ! दोन सख्ख्या बहि‍णींचा बुडून मृत्यू, जेवणापूर्वी हातपाय धुण्यासाठी गेल्या त्या परतल्याच नाहीत

SCROLL FOR NEXT