Women health : कुटुंबासाठी काबाडकष्ट करणाऱ्या महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष; 'या' अभियानातून आली धक्कादायक माहिती समोर

आतापर्यंत ७ लाख ९७ हजार महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली आहे.
Women health
Women healthSaam tv
Published On

Beed News : घरातील मुख्य पुरुषावर संपूर्ण घराचा भार असतो. त्याचप्रमाणे त्या घरातील स्त्रीवर देखील घराची जबाबदारी असते. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया नावलौकीक मिळवत आहेत. अशात घराची जबाबदारी संभाळून शहरातील महिला जशा नोकरी करत असतात. तशाच ग्रामीण भागातील महिला देखील शेतात मजूरीची कामे करताना दिसतात. मात्र खेड्यातील अनेक महिला आपल्या तब्येतीची काळजी घेत नाहीत. कुटुंबासाठी काबाडकष्टरत महिलांनी आरोग्याचीही काळजी घेतली पाहिजे यासाठी बीड जिल्ह्यात "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" हे अभियान राबवले जात आहे. (Latest Marathi News)

महिलांना त्यांच्या आरोग्याची माहिती देत या अभियानात मोफत आरोग्य तपासणी दिली जात आहे. २६ सप्टेंबरपासून या अभियानाला सुरुवात झाली. बीड (Beed) जिल्ह्यातील १० लाख ९५ हजार महिलांची आरोग्य तपासणी करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. मात्र अजूनही महिलांनी या अभियानाला १०० टक्के प्रतिसाद दिलेला नाही. ७५ टक्के महिलांनी या मार्फत आरोग्य तपासणी करून घेतली आहे. "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" योजनेची अंतिम दिनांक दोन वेळा वाढविण्यात आली आहे.

या अभियानात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालय, उपकेंद्र, कुटीर रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांमध्ये शिबिरे घेऊन आरोग्य तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र सुरुवातीपासून महिलांकडून या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महिलांना अजूनही त्यांच्या आरोग्याचे गांभिर्य समजलेले नाही असे म्हटले जात आहे. अभियानाला आता फक्त ५ दिवस शिल्लक आहेत. मात्र आतापर्यंत ७ लाख ९७ हजार महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली आहे. त्यामुळे पुढील ५ दिवसांत १०० टक्के महिलांची आरोग्य तपासणी करण्याचा प्रयत्न या अभियानातून केला जाणार असल्याचे शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी सांगितले.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji sawant) यांच्या पुढाकारातून "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अभियानाला सुरूवात झाली. बीड जिल्ह्यात अनेक व्यक्ती ऊसतोडणीची कामे करून उदनर्वाह करतात. यात महिलांचा देखील समावेश आहे. अशात सध्या ऊसतोडणीमुळे अनेकांचे स्थलांतर झाले आहे. त्यामुळे आरोग्य शिबिरात महिलांची १०० टक्के उपस्थिती अजूनही झालेली नाही, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. tanaji sawant

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com