सुषमा अंधारेंनी विभक्त पतीच्या शिंदेंच्या पक्षातील प्रवेशावर दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या...

सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी आज, रविवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
sushma andhare
sushma andhare saam tv
Published On

सचिन जाधव

Sushma Andhare news : शिवसेनेच्या ठाकरे गटात सुषमा अंधारे यांचे स्थान भक्कम होत असताना त्यांच्या विभक्त पतीने एकनाथ शिंदेंच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' (Shivsena) पक्षात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाची तोफ म्हणून नावारुपास आलेल्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) यांनी आज, रविवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

sushma andhare
Bhaskar Jadhav : चंद्रशेखर बावनकुळेंना संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? भास्कर जाधव असे का म्हणाले?

सुषमा अंधारे यांनी आज, रविवारी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. या पत्रकार परिषदेत सुषमा अंधारे म्हणाल्या, 'मला माझ्या विभक्त पतीच्या विषयावर काही बोलायचं नाही. मी ४-६ वर्षांपासून विभक्त आहे. यावर मी काही बोलणार नाही. ते काही करत होते, मला काहीच माहिती नाही. मला यावर बोलावसं वाटत नाही. प्रत्येकाचा वैयक्तिक आयुष्य आहे. त्यामुळे त्याच्यावर बोलण्यात अर्थ नाही. प्रत्येक व्यक्तीला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे तो त्यांचा अधिकार आहे'.

'सगळ्यांना व्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे यावर बोलणं मला योग्य वाटत नाही', असेही अंधारे पुढे म्हणाल्या. यावेळी अंधारे यांनी संजय राऊत यांना काही महिन्यांपूर्वी झालेल्या अटकेवर देखील भाष्य केलं. 'कोर्टाने राऊत यांच्याबाबत जे निरीक्षण नोंदवले आहेत की, त्यांची अटक बेकायदेशी आहे. अशी अटक होत असेल तर त्यावर आम्ही कोर्टात जाणार आहे. निष्ठावंत आम्ही सगळे लढणार आहोत. आमचा पवित्रा लढायचा आहे', असेही अंधारे म्हणाल्या.

sushma andhare
Chandrashekhar Bawankule: सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता हे राष्ट्रवादीचे धोरण; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

अंधारे यांनी यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावरही जोरदार टीका केली. 'संजय राठोडांचे प्रकरण कसं संपलं सांगा. तिचे आईवडील सगळे म्हणते होते. मग चित्रा वाघ का बदनामी करत होत्या. अशा गुन्ह्यात नाव घेतलं जात नाही. सर्व गुन्ह्यात बायकांची बदनामी करण्यात आली यावर बोलणार नाही का ? राहुल शेवाळे यांच्यावर काही बोलल्या नाहीत. आज चित्रा वाघ, म्हणत असतील तर संजय राठोडांचे प्रकरण संपले, तर त्यांना राजकीय पोळी भाजण्यासाठी वापर केला का ? असा सवाल अंधारे यांनी चित्रा वाघ यांना केला आहे. अंधारेंच्या टीकेनंतर चित्रा वाघ काय प्रतिक्रिया देतील, हे पाहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com