Bhaskar Jadhav : चंद्रशेखर बावनकुळेंना संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? भास्कर जाधव असे का म्हणाले?

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.
bhaskar jadhav
bhaskar jadhav saam tv
Published On

Bhaskar Jadhav News : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना संताजी-धनाजीची उपमा दिल्याने संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? असा सवाल भास्कर जाधव यांनी यांनी विचारला आहे. (Latest Marathi News)

bhaskar jadhav
चंद्रशेखर बावनकुळेंना शरद पवारांवरील 'ते' वक्तव्य महागात पडणार? राष्ट्रवादीची पोलिसांत तक्रार

भास्कर जाधव यांनी नालासोपाऱ्यात पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. यावेळी जाधव यांनी बावनकुळे यांचाही खरपूस समाचार घेतला. भास्कर जाधव म्हणाले, 'बावनकुळेंना विचारा ते कोणत्या अर्थाने धनाजी आणि संताजी आहेत. ते माझ्यापेक्षा चंद्रशेखर बावनकुळे जास्त सांगू शकतील. शिवाजी महाराजानंतर संभाजी महाराजांना पकडलं गेल्यानंतर २७ वर्ष औरंगाजेब मराठ्यांची गादी बळकविण्याकरता औरंगाजेब महाराष्ट्रात राहिला'.

bhaskar jadhav
CM Eknath Shinde: भंडारा जिल्ह्याला मुख्यमंत्र्यांची कोट्यवधींची भेट; विविध विकासकामांचं केलं भूमिपूजन

'२७ वर्षानंतर त्याच औरंगजेबाला महाराष्ट्राच्या मातीत दफन करावं लागलं, दफन व्हावं लागलं. त्यावेळेला २७ वर्ष मराठ्यांनी झुंज दिली. त्यावेळी अनेक सरदार राष्ट्रीय भावनेने रक्षणा करिता त्यांनी प्राण पणाला लावले. त्यांच्यामध्ये संताजी आणि धनाजींचे नाव खूप मोठे होते. शामियानाचा कळस कापून आणला असा त्यांचा इतिहास होता, असे ते म्हणाले.

'मात्र, एकनाथ शिंदेंची धनाजी आणि संताजी यांच्याबरोबर तुलना करत असाल, तर गेल्या चार महिन्यापूर्वी धनाजीचं काय झालं? ते महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे बावनकुळे काय ते सांगू शकतील, असे भास्कर जाधव पुढे म्हणाले. भास्कर जाधव यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केल्यानंतर त्यांच्याकडून काय प्रत्युत्तर दिले जाईल, हे पाहावे लागणार आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com