चंद्रशेखर बावनकुळेंना शरद पवारांवरील 'ते' वक्तव्य महागात पडणार? राष्ट्रवादीची पोलिसांत तक्रार

चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
sharad pawar and chandrashekhar bawankule
sharad pawar and chandrashekhar bawankule saam tv

ChandraShekhar Bawankule News : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांवरील वक्तव्य चांगलंच महागात पडताना दिसत आहे. सातारा जिल्ह्यात चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जादूदोणा केला, असं वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज, शनिवारी बावनकुळे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात येऊन चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर तक्रार दाखल करण्याची मागणी केली आहे. तपासे यांनी पोलिसांना निवेदन आणि सीडी देत तक्रारीची मागणी केली आहे.

sharad pawar and chandrashekhar bawankule
Jitendra Awhad: ...तर सरकारने मला फाशी दिली तरी मला मान्य, 'हर हर महादेव' चित्रपटाला जितेंद्र आव्हाडांचा विरोध कायम

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी आज, शनिवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात भेट देत चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्याविरोधात तक्रार दिली. त्यानंतर तपासे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

तपासे म्हणाले, 'शरद पवारांच्या (Sharad Pawar) आशीर्वादाने मागच्या सरकारने हे जादूटोणा, काळा जादू या विरोधी कायदा २०१३ मध्ये संमत केला. त्या कायद्याचे समर्थन भारतीय जनता पक्षाने देखील केलं. नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही समर्थन केलं. उद्धव ठाकरेंनी देखील समर्थन केलं'.

sharad pawar and chandrashekhar bawankule
Thane Police : जितेंद्र आव्हाड यांना अटक करणाऱ्या पोलीस उपायुक्तांची बदली

'दोन माजी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी ज्या कायद्याला समर्थन दिलं. त्या कायद्याच्या प्रचार किंवा त्या कायद्याच्या संदर्भामध्ये 'जादूटोणा करून शरद पवार आणि राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंना भाग पाडल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये गेले' हे वाक्य पूर्णपणे चुकीचे आहे.असे म्हणाले.

'जादूटोणा विरोधी कायदा आम्ही मागच्या वेळी केला. जादूटोण्याचा प्रचार आणि प्रसार हे बावनकुळे करत असतील तर पुरोगामी महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून दुर्दैवी आहे. त्याच्या संदर्भात मी तक्रार केली जर कायद्याचे उल्लंघन झालं असेल तर कायदा त्याचं काम करेल', असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com