Kishori Pednekar Saam tv
मुंबई/पुणे

Kishori Pednekar: कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकरांना मोठा दिलासा, हायकोर्टाने अंतरिम जामीन केला मंजूर

Covid Body Bag Scam Case: किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड काळात बॉडीबॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप आहे. हायकोर्टाने किशोरी पेडणेकर यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Priya More

कथित कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी (Covid Body Bag Scam) ईडीच्या रडावर असलेल्या मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांना मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) मोठा दिलासा दिला आहे. हायकोर्टाने किशोरी पेडणेकर यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड काळात बॉडीबॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणावर दिलासा मिळावा यासाठी किशोरी पेडणेकर यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. या प्रकरणावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान हायकोर्टाने किशोरी पेडणेकर यांना अंतरिम जामीन मंजूर केला. त्याचसोबत हायकोर्टाने किशोरी पेडणेकर यांना तपासात सहकार्य करण्याचे सांगितले आहे.

कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईच्या आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांच्यासोबत या प्रकरणात महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे.

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. कोविड काळात काढण्यात आलेल्या टेंडर प्रक्रियेत मोठा घोटाळा झाला असून यामध्ये किशोरी पेडणेकर यांचाही सहभाग आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला होता. यानंतर ईडीने या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांची देखील चौकशी केली होती.

दरम्यान, मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ED) म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

RBI Jobs: कोणतीही परीक्षा नाही थेट RBI मध्ये नोकरी; मिळणार भरघोस पगार; पात्रता अन् अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Dharashiv : हातात कोयते, गावठी कट्टे आणि हवेत गोळीबार, तुळजापूर राड्यात भाजपा आमदाराच्या पीएच नाव समोर

Maharashtra Corporation Election: महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी, मुंबईतल्या मराठी पट्ट्यासाठी शिंदे सेना आग्रही

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

SCROLL FOR NEXT