Supriya Sule: मी शारदाबाई पवारांची नात...रडणार नाही तर लढणार; सुप्रिया सुळेंचे विरोधकांना उत्तर

Baramati Loksabha Election 2024: पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गेल्यानंतर ते आता रडत बसतील असे वक्तव्य विरोधकांनी केले होते. विरोधकांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले आहे. 'मी शारदाबाई पवारांची नातं...रडणार नाही तर लढणार', असं म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.
Supriya Sule On Oppositions
Supriya SuleSaam Tv

बारामती लोकसभा मतदारसंघातून (Baramati Loksabha Election 2024) महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) निवडणुकीत्या रिंगणात उतरलेल्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज उमेदवारी अर्ज भरले. त्यानंतर महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेमध्ये भाषण करताना सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. पक्ष आणि पक्षाचे चिन्ह गेल्यानंतर ते आता रडत बसतील असे वक्तव्य विरोधकांनी केले होते. विरोधकांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळेंनी उत्तर दिले आहे. 'मी शारदाबाई पवारांची नातं...रडणार नाही तर लढणार', असं म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

सुप्रिया सुळे यांनी यावेळी भाषण करताना सांगितले की, 'आमच्या कामातून आणि संसदेच्या कामकाजातून पोचपावती आहे. ही निवडणूक महाराष्ट्राच्या जनतेने हातात घेतली आहे. लोकसभा, विधानसभा, ग्रामपंचायत आणि इतर निवडणुकांना आम्ही महाविकास आघाडी ताकदीने सामोरे जाणार आहोत. माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात आहे. जो मराठी माणसाच्या मुळावर उठलाय. आपली लढाई बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई विरोधात आहे.'

Supriya Sule On Oppositions
Madha Loksabha: माढ्यात नवा ट्वीस्ट! 'शेकाप'मध्ये फूट पडण्याची शक्यता; अनिकेत देशमुख अपक्ष अर्ज भरणार?

सुप्रिया सुळे यांनी यावेळी विरोधकांवर निशाणा साधत सांगितले की, 'आपलं चिन्ह गेलं आपला पक्ष पण गेला, तर विरोधी नेत्यांनी म्हटले होते आता रडत बसतील. पण मी शारदाबाई पवारांची नातं आहे. मला रडायला नाही तर लढायला शिकवलंय.', असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. तसंच, 'पांडुरंगाने मला काय दिलाय तर तुतारी. कोणतंही नवीन शुभकार्य करायचंय तेव्हा तुतारी असते. शिवरायांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच होती.' असे देखील त्यांनी सांगितले.

Supriya Sule On Oppositions
Pankaja Munde : बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही; पंकजा मुंडे आरक्षणावरून संतापल्या

दरम्यान, या सभेमध्ये ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे भरसभेत विरोधकांवर जोरदार कडाडल्या. सुषमा अंधारे यांनी भरसभेत वाघांची गोष्ट सांगत विरोधकांवर निशाणा साधला. 'झगडा शेर के बचडो के बीच का है, कुतो का यहा काम नही, शेर कुत्तो का फायदा नहीं होणे देंगे, अशी गोष्ट सांगत सुषमा अंधारे यांनी महायुती आणि अजित पवारांवर टीका केली.

Supriya Sule On Oppositions
Pankaja Munde : बाथा मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही; पंकजा मुंडे आरक्षणावरून संतापल्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com