Pankaja Munde : बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही; पंकजा मुंडे आरक्षणावरून संतापल्या

Beed News : इथं बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नसतं. आरक्षण पाहिजे असेल तर विधानसभेच्या निवडणुकीत मागा, असंही पंकजा मुंडेंनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं आहे.
Pankaja Munde
Pankaja Munde NewsSaam tv
Published On

विनोद जिरे

विधानसभेच्या निवडणुकीत आरक्षण मागा. मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला आरक्षणाचा शब्द दिलाय. बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नाही, अशा शब्दांत पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला.

Pankaja Munde
Special Report | Pankaja Munde यांच्या समोर मविआ तग धरेल का? | Marathi News

आष्टी तालुक्यातील उंदरखेल येथे जाहीर सभेत पंकजा मुंडे बोलत होत्या. पंकजा मुंडे यांनी आता बीड जिल्ह्यात जाहीर सभांचा धडाका लावलाय. जाटनांदूर येथे सभा झाल्यानंतर त्यांनी उंदरखेल येथे मतदारांशी संवाद साधलाय. यावेळी बोलताना पंकजा मुंडेंनी असं म्हटलंय.

राज्यात मराठा आरक्षणााचा मुद्दा अद्याप शांत झालेला नाही. अशात पंकजा मुंडेंनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदेंना त्यांना त्यांच्या कर्तव्याची देखील आठवण करून दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचा शब्द दिलाय. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाने विधानसभेच्या सदस्याने ठराव करायचा, अध्यादेश काढायचा, मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा, कॅबिनेटमध्ये तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचे कर्तव्य आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं.

दरम्यान, इथं बाता मारून आणि आमरण उपोषण करून आरक्षण मिळत नसतं. आरक्षण पाहिजे असेल तर विधानसभेच्या निवडणूकीत मागा, असंही पंकजा मुंडेंनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटलं आहे.

सध्या फेसबुक व्हाट्अॅप उघडले, युट्यूब उघडले की पंकजा मुंडे यांच्यासमोर खतरा, पंकजा मुंडे यांच्यासमोर आव्हान, पंकजा मुंडे यांची निवडणूक धोक्यात असं बघायला मिळतं. पण माझी निवडणूक धोक्यात नाही तर, माझ्या विजयासाठी अनेक हात सज्ज आहेत, असंही पंकजा मुंडेंनी यावेळी ठामपणे सांगितलं.

Pankaja Munde
Chhatrapati Sambhajinagar Crime: लॉजमध्ये थरार! डॉक्टर प्रेयसीच्या गळ्यावर वार, प्रियकराचाही आत्महत्येचा प्रयत्न; छत्रपती संभाजीनगरमध्ये खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com