Dharamraobaba Aatram: विजय वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करणार का?, पुरावे मागितले; आत्राम म्हणाले नार्को टेस्ट करा

Vijay Wadettiwar Vs Dharamraobaba Aatram: मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अनेकदा प्रचार सभांमध्ये वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे विजय वडेट्टीवार यांनी खंडन करत धर्मराव बाबा आत्राम खोटे बोलत असल्याचे सांगितले.
Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSaam Tv

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) 4 जूननंतर भाजपमध्ये (BJP) प्रवेश करण्याबाबत भाजपचे नेते आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी अनेकदा प्रचार सभांमध्ये वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचे विजय वडेट्टीवार यांनी खंडन करत धर्मराव बाबा आत्राम खोटे बोलत असल्याचे सांगितले.

त्याचसोबत त्यांनी धर्मराव बाबा यांनी आरोप सिद्ध करावे आणि कोणत्या हॉटेलमध्ये बैठक झाली याचा खुलासा करावा असे आवाहन केले. त्यांच्या या आव्हानाला धर्मराव बाबा आत्राम (Dharamraobab Aatram) यांनी उत्तर दिले. 'मी बोललेलं खोटं असेल तर माझी आणि वड्डेटीवार यांची एकत्र नार्को टेस्ट करा.', असे वक्तव्य धर्मराव बाबा आत्राम यांनी केले आहे.

धर्मराव बाबा आत्राम यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, 'मुंबईच्या विमानतळावर टर्मिनल एकमध्ये त्या वेळचे मंत्री असलेले विजय वडेट्टीवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माझ्या उपस्थितीत आमची बैठक झाली. यामध्ये वडेट्टीवार भाजपमध्ये प्रवेश करण्यावर चर्चा झाली. हे खोटं असेल तर विजय वडेट्टीवार आणि माझी एकत्र नार्को टेस्ट करा.या बैठकीसंदर्भात अधिक माहिती चंद्रशेखर बावनकुळे देतील.' असे म्हणत आता आत्राम यांनी वड्डेटीवार यांनाच आव्हान दिले आहे.

Vijay Wadettiwar
Supriya Sule: मी शारदाबाई पवारांची नात...रडणार नाही तर लढणार; सुप्रिया सुळेंचे विरोधकांना उत्तर

मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या या वक्तव्यानंतर विजय वड्डेटीवार यांनी मी नार्को टेस्टसाठी तयार असल्याचे सांगितले. त्यांनी सांगितले की, 'मला वाटलं काही गौप्यस्फोट करतील. आत्राम म्हणतात एअरपोर्टवर VIP लाउंज मध्ये बैठक झाली. अशा बैठका विमानतळावर होतात का? थोडं आरोप करताना भान ठेवावे. बावनकुळे स्वतः म्हणाले की अशी काही चर्चा नाही आणि प्रस्ताव नाही. माझी तयारी आहे नार्को टेस्ट करायला. माझी, बावनकुळे आणि आत्राम आमची नार्को टेस्ट करावी.'

Vijay Wadettiwar
Kishori Pednekar: कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकरांना मोठा दिलासा, हायकोर्टाने अंतरिम जामीन केला मंजूर

तसंच, 'मंत्री असताना कोणी दुसऱ्या पक्षात जाईल का?, असा सवाल करत हे सत्तेचा उपभोग घ्यायला गेले. माझ्याशी पंगा घेतला तर मी जशाच तसे उत्तर देईल. माझ्यावर आरोप केले तर मी पण मग काही खुलासे करीन, वैयक्तिक पण करेल.', असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.

Vijay Wadettiwar
Koyana Dam: मोठी दुर्घटना! कोयनेच्या शिवसागर जलाशयात स्पीड बोट बुडाली, तिघे करत होते प्रवास

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com