मुंबईत कुठेही जा तुम्हाला वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. रोज लाखो लोक मुंबईत प्रवास करतात. अनेक ट्रक, जड वाहने रोज मुंबईत येतात. जवाहरलाल नेहरु बंदरावर ट्रक सारखे ये-जा करत असतात. तसेच तीन मार्गांकडे जाणारी वाहतूक यामुळे ट्राफिक होते.
यामुळे कल्याण, मुंबई, ठाण्याला जोडणारे रस्ते यामुळे कंळबोळी हे नेहमी वाहतूक कोंडीत असते.ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता येथे डबलडेकर इंटरचेज तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूक कोडीं जास्त प्रमाणात होणार आहे. यासाठी ७५५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. (Mumbai Double Decker Interchange)
कंळबोली जंक्शनला पनवेल-शीव रस्ता जोडला जातो. तोच रस्त मुंबई पुणे एक्सप्रेस वेला जोडतो. तर दुसरा मुंबई पुणे जुना रस्ता पुण्याकडे जातो. पनवेलमार्गे गोव्याचे दिशेनेदेखील राष्ट्रीय महामार्ग याच जंक्शनवरुन जातो. यामुळे कंळबोली येथील वाहतूक कोंडीमध्ये प्रवाशांना खूप त्रास होतो.यामुळेच एनएचआयने डबलडेकर पुलाचे काम सुरु केले आहे.
डबलडेकर इंटरचेंजमध्ये जमिनीवरील वाहतूक सुरु राहिल. त्यानंतर वरुन एक पुल असेल आणि त्यावरदेखील एक पुल तयार करण्यात येणार आहे. याशिवाय शीळफाटा आणि कल्याणकडून नवी मुंबईत जाण्यासाठी भूमिगत रस्ता तयार केला जात आहे. याच्या बाहेर मुंबई-पुणे जुना महामार्गदेखील आहे. यामध्ये पहिल्या मजल्यावरुन मुंबईकडून गोव्याकडे जाणारी वाहतूक असेल. ज्यांना मुंबई पुणे जुन्या महागामार्गाचे प्रवास करायचा आहे त्यांनाही पहिल्या मजल्यावरुन जाता येईल. तर शीळफाटा- कल्याण ते गोवा, शीळफाटा-कल्याण- मुंबई पुणे एक्सप्रेस वेसाठी जाणाऱ्या वाहनांना दुसऱ्या मजल्याचा वापर करावा लागेल.
कंळबोळी जंक्शनमुळे मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. हा प्रकल्प १५.५३२ किमीचा असणार आहे.भूमिगत रस्त्याची लांबी ८७१ मीटर असणार आहे. यासाठी प्रत्यक्ष बांधकाम खर्च हा ६९७.२२ कोटी रुपये आहे. देखभाल, आप्तकालीन खर्च पकडून ७५५.७१ कोटी रुपये होऊ शकतो
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.