Mumbai Crime: कॉलेजला निघालेल्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन अत्याचार; मुंबईतील संतापजनक घटना

Mumbai Crime News: पुणे एक्सप्रेस वे येथील झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
Sexual Abuse Blackmail
Sexual Abuse BlackmailSaam TV

मुंबई: अल्पवयीन मुलीचे अपहरण (Kidnap) करुन तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईत एका अल्पवयीन मुलीचे वडाळा येथून अपहरण करुन तिच्यावर पुणे एक्सप्रेस वे येथील झाडीत नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. (Mumbai Crime News)

Sexual Abuse Blackmail
नवापूर तालुक्यात धो धो, पूर्व पट्ट्यात मात्र पावसाने फिरवली पाठ; पावसासाठी काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वडाळा पूर्व परिसरात ही मुलगी राहते. ५ सप्टेंबर ला पीडित मुलगी कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. पीडित मुलगी राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था, वडाळा येथे पोहचली असताना आरोपी विशाल विरकर हा बोलेरो गाडी घेऊन तेथे आला होता. यावेळी त्याने मुलीला आपल्या गाडीत जबरदस्तीने बसवले. यानंतर तो पीडित मुलीला पुणे एक्सप्रेस वे येथील झाडीत घेऊन गेला. याठिकाणी त्याने पीडितेला धमकावून आणि मारहाण करत तिच्यावर त्याने अत्याचार (Sexual Assault) केले असा आरोप पीडितेने केला आहे.

Sexual Abuse Blackmail
Mid Day Meal : निकृष्ट पोषण आहार प्रकरणी मुख्याध्यापक निलंबित

या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार कंळबोली पोलिस ठाण्यात सुरवातीला गुन्हा दाखल केला. त्यानंतर पुढील तपासासाठी हा गुन्हा माटुंगा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला. माटुंगा पोलिस ठाण्यात आरोपी विशाल विरकर विरोधात ३६३, ३६६(अ), ३७६, ३२३, ५०६ भा.द.वि कलमासह ४,८,६ पोस्को कायद्यांतर्गग गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com