Gondia News : विद्यार्थ्यांना (student) दिला जात असलेला पोषण आहार निष्कृष्ट दर्जाचा असल्याचे प्रकरण गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील ग्राम अंजोरा येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेतील (school) मुख्याध्यापक बी. सी. ठाकरे यांच्या अखेर अंगलट आले. या प्रकरणात मुख्याध्यापक ठाकरे यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निलंबित केले.
एक सप्टेंबरला ग्राम अंजोरा येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी शाळेत भेट देऊन पोषण आहाराची तपासणी केली होती. त्यात निकृष्ट दर्जाचा पोषण आहार विद्यार्थ्यांना दिला जात असल्याची बाब उघडकीस आली होती. डाळीत अळ्या असतानाही विद्यार्थ्यांना तशीच डाळ शिजवून दिली जात होती. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्याचे विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितले होते.
त्यामुळे पालकांनी शाळेत धडक देत सगळा प्रकार उघडकीस आणला होता. संतापलेल्या पालकांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना मुख्याध्यापकांवर कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी, पोषण आहार अधीक्षक, आमगावचे गटशिक्षणाधिकारी यांनी शाळेला भेट देऊन पोषण आहाराची तपासणी करून तसा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे दिला होता.
या अहवालानूसार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मुख्याध्यापक ठाकरे यांना निलंबित केले. त्याबाबतचा आदेश देखील काढला. या प्रकरणात मुख्याध्यापकांसोबत आहार शिजविणाऱ्या महिलांवर देखील कारवाई होणे गरजेचे आहे असं पालकांचे म्हणणे आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.