नवापूर तालुक्यात धो धो, पूर्व पट्ट्यात मात्र पावसाने फिरवली पाठ; पावसासाठी काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

नवापूर तालुक्यात धो धो, पूर्व पट्ट्यात मात्र पावसाने फिरवली पाठ; पावसासाठी काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा
Nandurbar Rain Update
Nandurbar Rain UpdateSaam tv

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वत रांगेतील धडगाव, अक्कलकुवा, तळोदा, शहादा तसेच नवापूर (Navapur) तालुक्यात यंदा धो– धो पाऊस (Rain) झाला असला तरी नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र आहे. या भागातील रजाळे, बलवंड, सैताने, खर्दे, तलावडे या गावातील लोकांना अद्यापही चांगल्या पावसाची प्रतिक्षा कायम आहे. (Nandurbar News No Rain)

Nandurbar Rain Update
Ajit Pawar: ..तर विरोधीही वाकड्या नजरेने पाहणार नाही : अजित पवार

नंदुरबार (Nandurbar) तालुक्यातील पूर्व पट्ट्यात गेल्या चार- पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. यावर्षीही जिल्ह्यातील इतर भागात अतिवृष्टी (Heavy Rain) झाली असली तरी पूर्वपट्ट्यात पावसाने पाठ फिरवली आहे. बळीराजांनी (farmer) हजारो रुपये खर्च करून पेरणी केली. परंतु, पावसाअभावी पिके करपायला लागली आहेत. तर दुसरीकडे पिकांची वाढ खुंटली आहे.

दुष्‍काळ जाहीर करण्याची मागणी

जिल्हा प्रशासन आणि कृषी विभाग दुर्लक्ष करत असून या भागात नुकसानीचे पंचनामे करून शासनाला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अहवाल पाठवावा. तसेच पूर्वपट्ट्यातील धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने या भागात येणाऱ्या काही दिवसात पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याचे आतापासून नियोजन करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजीत मोरे यांनी केली आहे.

प्रतिकात्‍मक अंत्‍ययात्रा

पाऊस पडण्यासाठी बलवंड गावच्या ग्रामस्थांनी प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढली. अशी यात्रा काढल्यानंतर दोनच दिवसात पाऊस येतो अशी ग्रामस्थांची धारणा असल्याने या प्रतिकात्मक यांत्रेचे आयोजन करण्यात आले होते. या आगळ्या वेगळ्या प्रथेची चर्चा होत असली तरी या भागात पाऊस बरसेल हिच शेतकऱयांची अपेक्षा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com