Surabhi Jayashree Jagdish
जोडीदाराच्या मनातील आज ओळखण्याचा दिवस आहे. डोके थंड आणि चित्त शांत ठेवावे लागेल.
नोकरीमध्ये काही बदल होण्याची आज शक्यता आहे. बाहेरील खाण्यामुळे होणाऱ्या तक्रारी यापासून आज सावधगिरी बाळगावी
विवाहाच्या बाबतीत काही छान गोष्टी कानावर येतील. संततीकडून आनंदवार्ता कानी येतील.
मातृसौख्याला दिवस उत्तम आहे. शेतीचे काम, प्रॉपर्टीचे व्यवहार यामध्ये यश लाभेल.
काही जबाबदाऱ्या विशेषत्वाने अंगावर घ्याव्या लागतील. जिद्दीने काम करावे लागेल.
प्रेमाची माणसे जवळ असल्यावर आपल्याला एक वेगळा आधार वाटतो. घरामध्ये धार्मिक कार्य याच्यामध्ये सुद्धा आज सहभाग घ्याल.
रसिक असणारी आपली रास आहे. मनोरंजनात्मक कार्यात आज पुढाकार घ्याल.
कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आज तोंड द्याल. कदाचित मनोबल कमी राहिले तरी शारीरिक क्षमता चांगली ठेवून यश खेचून आणाल.
आपण केलेल्या गोष्टीचा योग्य परतावा मिळण्याचा आजचा दिवस आहे. खूप संयमाने वागलेल्याचे आज परिणाम आणि फलित उत्तम मिळतील.
सामाजिक कार्यात विशेष पुढाकार घेऊन चालाल. कोणत्याही कष्टाला आज पर्याय नाही हे समजून जाल आणि यश खेचून आणाल.
काही गोष्टी मनाला पटणार नाहीत, पण बुद्धीला पटतील. आज दोघांमधील योग्य समन्वय साधावा. शिव उपासना फायदेशीर ठरेल.
आज कुठेही साक्षीदार राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर केलेली बरी किंवा उद्यावर ढकलले तर योग्य राहील.