Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा तीन दिवसांचा ब्लॉक, मुंबई- पुण्याच्या वाहतुकीत बदल

Mumbai-Pune Expressway Block: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वरसोली टोलनाका येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळवण्यात येणार आहे.
Mumbai-Pune Expressway
Mumbai-Pune Expressway Block Saam Tv
Published On

मुंबई-पुणे प्रवास रस्तेमार्गाने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर पुन्हा एकदा तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक २७ जानेवारीपासून पुढे तीन दिवस गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. याच कारणामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना योग्य नियोजन करावे लागणार आहे. काही दिवसांपूर्वी डोंगरगाव-कुसगावनजीक पुणे वाहिनीवर पूल बांधला जात आहे.

त्याचे गर्डर बसवण्यासाठी नुकताच तीन दिवसांचा ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर आता याच मार्गावर आता पुन्हा ब्लॉक घेण्यात आलाय. एमएसएरडीसीकडून येत्या २७ ते २९ जानेवारी या तीन दिवशी ब्लॉक घेण्यात येणार आहे. दररोज दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत तासांचा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळालीय. त्यामुळे या काळात मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक इतर मार्गाने वळवली जाणार आहे.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेने मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक वळवण ते वरसोली टोलनाका येथून देहूरोडमार्गे पुण्याकडे वळवण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक मुंबई वाहिनीवरून सुरू राहणार आहे. या वाहतूक बदलाची नोंद घेऊन वाहनधारकांना आपल्या प्रवासाचे नियोजन करावे लागेल. प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी एमएसआरडीसीने याबाबत आवाहन केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com