
आजचे पंचांग
शुक्रवार,४ जुलै २०२५,आषाढ शुक्लपक्ष.
तिथी-नवमी १६|३२
रास-तुला
नक्षत्र-चित्रा
योग-शिव
करण-कौलव
दिनविशेष-उत्तम दिवस
मेष - जोडीदाराच्या मनातील आज ओळखण्याचा दिवस आहे. आनंदाचे क्षण एकत्र उपभोगाल. छोट्याशा गोष्टीमुळे काही बीनसणार नाही ना? यासाठी डोके थंड आणि चित्त शांत ठेवावे लागेल.
वृषभ - नोकरीमध्ये काही बदल होण्याची आज शक्यता आहे. जवळच्या लोकांकडून त्रास संभवतो आहे. गुप्तरोग,बाहेरील खाण्यामुळे होणाऱ्या तक्रारी यापासून आज सावधगिरी बाळगावी. दिवस संमिश्र आहे.
मिथुन -विवाहाच्या बाबतीत काही छान गोष्टी कानावर येतील. आपल्याच नातेसंबंधात मधून फायदा बघायचा नसतो, पण आज याचा विशेष लाभ होईल. संततीकडून आनंदवार्ता कानी येतील. विष्णू उपासना फलदायी ठरेल.
कर्क - मातृसौख्याला दिवस उत्तम आहे. आपल्याला समजून घेणारे कुटुंबीय मिळाले याचा आपल्याला रास्त अभिमान आज वाटेल. शेतीचे काम, प्रॉपर्टीचे व्यवहार यामध्ये यश लाभेल.
सिंह - काही जबाबदाऱ्या विशेषत्वाने अंगावर घ्याव्या लागतील. जिद्दीने काम करावे लागेल. भावंडांसाठी विशेष काहीतरी कार्य करावे लागेल. आपण त्यांचे पोशिंदे असल्यासारखी जाणीव आज होईल.
कन्या - प्रेमाची माणसे जवळ असल्यावर आपल्याला एक वेगळा आधार वाटतो. घरामध्ये धार्मिक कार्य याच्यामध्ये सुद्धा आज सहभाग घ्याल. पैशाची आवक चांगली असल्यामुळे मनस्थिती छान राहील.
तूळ - रसिक असणारी आपली रास. मनोरंजनात्मक कार्यात आज पुढाकार घ्याल. कोणतीही गोष्ट असू दे सकारात्मकतेने घेण्यासाठी आज मन ओढ घेईल. आपल्यामुळे इतरांना कामाचा वेगळा हुरुप येईल.
वृश्चिक - मोठ्या प्रवासाचे आयोजन, नियोजन तुमच्याकडून घडेल. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आज तोंड द्याल. कदाचित मनोबल कमी राहिले तरी शारीरिक क्षमता चांगली ठेवून यश खेचून आणाल.
धनु - "केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे". आपण केलेल्या गोष्टीचा योग्य परतावा मिळण्याचा आजचा दिवस आहे. खूप संयमाने वागलेल्याचे आज परिणाम आणि फलित उत्तम मिळतील. धनयोग छान आहेत.
मकर - सामाजिक कार्यात विशेष पुढाकार घेऊन चालाल. इतरांना समजून घेण्याची ताकद मुळामध्ये तुमच्याकडे आहे. कोणत्याही कष्टाला आज पर्याय नाही हे समजून जाल आणि यश खेचून आणाल.
कुंभ - देव आणि दैवत्व याविषयीच्या संकल्पना आणि याचा शोध घेण्यामध्ये आज व्यस्त रहाल. काही गोष्टी मनाला पटणार नाहीत,पण बुद्धीला पटतील. अशी आपली रास आहे. पण आज दोघांमधील योग्य समन्वय साधावा. शिव उपासना फायदेशीर ठरेल.
मीन - आज कुठेही साक्षीदार राहू नका. महत्त्वाची कामे शक्यतो दुपारनंतर केलेली बरी किंवा उद्यावर ढकलले तर योग्य राहील. साधेपणामुळे जग जिंकता येत नाही. शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ आज हे लक्षात घ्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.