Pune Airport Road  Saam Tv
मुंबई/पुणे

Pune Traffic: पुणेकरांसाठी गुड न्यूज! विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार, सरकारचा जबरदस्त प्लान

Pune Airport Road : पुण्यातील विमानतळ रोडवर मोठी वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीचा प्रश्न आता लवकरच सुटणार आहे. सरकारने जबरदस्त प्लान तयार केला असून या रस्त्याचे रुंदीकरण आणि सुशोभिकरण केले जाणार आहे.

Priya More

Summary -

  • पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार

  • विमानतळ रस्ता १२ मीटरवरून २४ मीटर रुंद केला जाणार

  • या रस्त्यावरील प्रवास अधिक आरामदायी आणि सुसाट होईल

  • पुण्यात जागतिक दर्जाचा रस्ता विकसित केला जाणार

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पुणे शहरातील प्रमुख रस्त्यांच्या रुंदीकरणासह डागडुजी आणि अनेक ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. यातलाच एक भाग म्हणजे विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरकारने जबरदस्त प्लान तयार केला आहे. विमानतळ रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जाणार आहे. त्यामुळे विमातळ रस्त्यावरील प्रवास सुसाट आणि आरामदायी होणार आहे.

पुण्यातील विमानतळ रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत असते. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना पुणेकरांचे चांगलेच हाल होते. आता हा वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार आहे. रुंदीकरणासह आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना पर्यटकांना पुण्याच्या समृद्ध वारसा, कला, संस्कृतीचे दर्शन घडणार आहे. हवाई मार्गाने पुण्यात येणाऱ्या पर्यटक-प्रवाशांना लवकरच जाता- येताना उत्तम दर्जाचा प्रशस्त रस्ता उपलब्ध होणार आहे.

नागपूर चाळ ते विमानतळ प्रवेशद्वारापर्यंतचा रस्ता सध्याच्या १२ मीटरचा आहे. हा रस्ता २४ मीटर रुंद केला जाणार असून त्याला सुशोभीकरणाची जोड दिली जाणार आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) विकसित होणाऱ्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे, अशी माहिती पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

काय असणार या रस्त्याची वैशिष्ट्ये?

- नागपूर चाळ ते विमानतळ रस्ता १२ मीटरवरून २४ मीटर रुंद होणार

- जागतिक दर्जाचा रस्ता विकसित केला जाणार

- पादचारी मार्ग, शोभिवंत झाडे, कारंजी, विद्युत रोषणाई

- प्रवासी आणि नागरिकांसाठी आकर्षक फर्निचर

- चित्र आणि शिल्पांद्वारे उलडगणार पुण्याचा गौरवशाली वारसा

- या रस्त्यावर घडणार कला, संस्कृती, परंपरेचे दर्शन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणी मोठी अपडेट, २ पोलिसांचे निलंबन

खुशखबर! टोल माफीवर सरकारचा मोठा निर्णय, या वाहनांना सगळीकडेच टोलमाफ

लग्नात हुंडा मिळाला नाही; नवऱ्याचं डोकं फिरलं, बायकोसोबतच्या खासगी क्षणाचे व्हिडिओ केले व्हायरल

Viral Video : हात जोडले, आरती ओवाळली; फुटपाथवरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या तरुणासोबत महिलेने काय केलं पाहा। VIDEO

Kidney damage symptoms: सकाळी अंथरूणातून उठताच ही लक्षणं दिसली तर समजा किडनी खराब झालीये; 99% लोकं करतायत दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT