Nagpur News: आंदोलन करणाऱ्या महिलेचा आत्मदहनाचा प्रयत्न, नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान धक्कादायक घटना|Video Viral

Maharashtra Nagpur Winter Session: नागपूर हिवाळी अधिवेशनदरम्यान धक्कादायक घटना घडलीय. यशवंत स्टेडियमजवळ आंदोलन करणाऱ्या एका महिलेने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.
Maharashtra Nagpur Winter Session
Police officers restraining the woman protester after her self-immolation attempt near Yashwant Stadium during the Nagpur Winter Session protest.saam tv
Published On
Summary
  • पुण्यातील खराडी-चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पातील अन्यायाविरोधात आंदोलन

  • बोगस संमतीपत्रावर बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न

  • सीताबाई धांडे यांनी रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान एका आंदोलनकर्त्या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. नागपूर हिवाळी अधिवेशनावेळी धरणे आंदोलनात एका महिलेनं आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यशवंत सीताबाई धांडे असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचं नाव आहे. नागपूरमधील यशवंत स्टेडियम परिसरात ही घटना घडली. आंदोलन करणाऱ्या महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यानं पोलीस दलाची मोठी तारांबळ उडाली.

Maharashtra Nagpur Winter Session
Ladki Bahin Yojana : २६ लाख अपात्र महिला अन् १४ हजार पुरूषांनी घेतला लाडकीचा लाभ, सरकारचं कोट्यवधींचं नुकसान

यशवंत स्टेडियम परिसरात पुण्यातील खराडी-चंदन नगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पासाठी आंदोलन करण्यात येत होते. बोगस संमतीपत्रावर बिल्डरने जागा बळकावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय. यासह विकासकामात लावलेल्या आगीत 100 झोपड्या जळाल्याने आंदोलक आक्रमक झाले होते. 23 एप्रिल 2025 च्या पुण्यात लागलेल्या आगीत दोन तरुणांचा मृत्यू झाला होता, मात्र बिल्डरवर अद्याप गुन्हा दाखल न केल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.

Maharashtra Nagpur Winter Session
Maharashtra Politics: धुसफूस संपली! फडणवीस-शिंदे यांची महत्त्वाची बैठक, एकत्र लढवण्यावर शिक्कामोर्तब

राजकीय दबावामुळे बिल्डरला अटक होत नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे महिलांनी नागपुरात येऊन आंदोलन केलं. मात्र सरकारकडून कोणतीची कारवाई होत नसल्यानं आंदोलक करणाऱ्या सीताबाई धांडे यांनी रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं अनर्थ टळला. आत्मदहनाचा इशारा देताना त्यांनी रुमाल जाळला. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि अर्नथ टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com