भिवंडीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला
बंडखोर उमेदवार नारायण चौधरी विजयी
भाजपच्या स्नेहा पाटील यांचा पराभव
काँग्रेसच्या रणनीतीमुळे सत्ता गणित बदलले
भिवंडीमध्ये काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला. भिवंडी महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील यांना फक्त १ ६ मतं मिळाली. भाजपचे बंडखोर नारायण चौधरींना ४८ मतं मिळवण्यात यश आले.
भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये नारायण चौधरी यांचा विजय झाला आहे. नारायण चौधरी भिवंडीचे महापौर झाले आहेत. नारायण चौधरी यांना एकूण ४८ मतं पडली आहेत. भिवंडी महानगरपालिकेचे नवीन महापौर म्हणून नारायण चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आल्यानंतर एकच जल्लोष करण्यात आला. मुस्लिम बहुल परिसरामध्ये नारायण चौधरी हे महापौर झाले असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.
कोणार्क विकास आघाडीचे उमेदवार विलास रघुनाथ पाटील यांना एकूण २५ मत मिळाली. तर भाजपच्या उमेदवार स्नेहा पाटील यांना एकूण १६ मत पडली. तर भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी यांना सर्वाधिक ४८ मतदान पडल्यामुळे त्यांची महापौरपदी निवड झाली. हा भाजपसाठी सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
भिवंडी महापौरपदाच्या निवडणुकीदरम्यान, काँग्रेसचे नगरसेवक तारिक मोमिन यांनी महापौर आणि उप महापौर दोन्ही पदासाठी अर्ज भरला होता. पण नंतर त्यांनी जिल्हाधिकारी श्रीकृष्णा पांचाळ यांच्याकडे जाऊन महापौरपदाचा अर्ज मागे घेतला होता. अपक्ष जावेद दळवी, बाळाराम चौधरी त्याचबरोबर मयुरेश पाटील, भिवंडी कोणार्क विकास आघाडीचे प्रतिभा विलास पाटील यांनी देखील आपला महापौरपदासाठी भरलेला अर्ज माघारी घेतला. महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये ९ पैकी ६ जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे महापौरपदासाठी नारायण चौधरी, विलास पाटील आणि स्नेहा पाटील या तिघांमध्ये लढत झाली. भिवंडी महानगर पालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक स्वर्गीय विलासराव देशमुख सभागृहात पार पडली.
दरम्यान, मुस्लीम बहुल शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत कोणत्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते. काँग्रेसला सर्वाधिक ३० जागा मिळवण्यात यश मिळाले होते. त्यापाठोपाठ भाजपा २२, शिवसेना १२,राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला १२, समाजवादी पार्टीला ६, कोणार्क विकास आघाडीला ४, भिवंडी विकास आघाडीला ३ आणि अपक्ष उमेदवनाराला १ जागेवर यश मिळवण्यात यश आले होते.
महापालिका निवडणूक एकत्र लढलेल्या महायुतीची संख्या ३४ तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची संख्या १२ यांची गोळाबेरीज ४२ झाली होती. त्यामुळे बहुमतासाठी छोट्या पक्षांना आणि आघाडी यांना महत्व प्राप्त झाले होते. ज्यामध्ये कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील हे आघाडीवर होते. त्यांनी महापौरपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. पण महापौरपदाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसने भाजपला शह दिला. भाजपचे बंडखोर उमेदवार नारायण चौधरी हे काँग्रेसमध्ये सामील झाले आणि या निवडणुकीमध्ये विजय मिळवत ते महापौर झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.