

भिवंडी महानगरपालिकेतील महापौर पदाचा संघर्ष टोकाला पोहोचलाय.
समाजवादी पक्षाचे ६ नगरसेवक नॉट रिचेबल झालेत.
काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा अडचणीत आलाय.
भिवंडी महानगरपालिकेतील महापौर पदाचा सत्तासंघर्ष टोकाला पोहोचलाय. समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक हे ऐनवेळी नॉट रिचेबल झालेत. त्यामुळे काँग्रेसचा सत्ता स्थापनेचा दावा फेल होताना दिसतोय. भिवंडीमध्ये काँग्रेसचे सर्वाधिक ३० नगरसेवक असून बहुमताचा आकडा हा ४६ इतका आहे.
भिवंडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष एकत्र येत ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ स्थापन करत महापौर पदाचा दावा केला होता. या आघाडीत काँग्रेसचे ३०,समाजवादी पक्षाचे ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे १२ नगरसेवक असा मिळून एकूण ४८ सदस्यांचा गट असल्याचा दावा गेला होता. त्यानंतर काँग्रेसनं महापौरसाठी आग्रही होते. काँग्रेसकडून महापौर पदासाठी तारीक मोमीन यांच्या नावाची चर्चा होती.
मात्र ऐनवेळी समाजवादी पक्षाचे सर्व नगरसेवक नॉट रिचेबल झाले आहेत. यामुळे बहुमताचा डाव फसणार की काय अशी चर्चा सुरू आहे. परिणामी भिवंडीतील राजकीय समीकरणे बदलू शकतात. समाजवादी पक्षाचे ६ नगरसेवक गायब झालेत. दुसरीकडे महायुतीकडून आकडे जुळवण्याचा प्रयत्न सुरू झालाय. जर समाजवादी पक्षाचे नगरसेवक जर महायुतीकडे आले तर महायुतीदेखील महापौरपदावर दावा करू शकते.
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी उघडपणे समाजवादी पक्षाच्या नगरसेवकांच्या विरोधात काम केलंय. काँग्रेस-राष्ट्रवादी यांना उघड समर्थन देऊन प्रचार देखील केला होता. त्यामुळे समाजवादी पक्षाच्या अनेक उमेदवारांचा पराभव झाला. नेमका हाच राग लक्षात घेऊन सहा समर्थक ऐनवेळी नॉट रिचेबल झाल्याची चर्चादेखील सुरूय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.