ZP Election: निवडणूक अन् CTET परीक्षा एकाच दिवशी; इलेक्शन ड्युटी करुन परीक्षा कशी द्यायची? शिक्षकांच्या मनात संभ्रम

CTET Exam and Teacher Election Duty Conflict: राज्यातील झेडपी निवडणुकीची तारीख पुढे ढकलली आहे. यामुळे ७ तारखेला मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शिक्षकांची CTET परीक्षा आहे. त्यामुळे शिक्षकांनी इलेक्शन ड्युटी संपवून परीक्षा कशी द्यायची असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.
ZP Election
ZP ElectionSaam Tv
Published On
Summary

जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलल्या

७ तारखेला मतदान तर ८ तारखेला शिक्षकांची CTET परीक्षा

इलेक्शन ड्युटी संपवून दुसऱ्या दिवशी पेपरला कधी जाणार? शिक्षकांचा प्रश्न

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आता ५ ऐवजी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. दरम्यान, या बदललेल्या वेळापत्रकामुळे शिक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. शिक्षकांची सीटीईटी (CTET) परीक्षा ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. दरम्यान, आता निवडणुका पुढे ढकल्याने इलेक्शन ड्युटी करुन दुसऱ्या दिवशी परत परीक्षेला कसं जायचं असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे.

ZP Election
TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

राज्यात CTET परीक्षा 8 फेब्रुवारीला होणार आहे. ७ तारखेला मतदान साडेपाच पर्यंत आहे. त्यानंतर इलेक्शन ड्युटी संपवून सामान वगैरे पॅक करणे.त्यानंतर एसटीने तालुक्याच्या ठिकाणी जाणे नंतर सामान जमा करणे यासाठी कमीत कमी रात्री ११ ते १२ वाजतील. इलेक्शनचे सामान जमा केल्यानंतर शिक्षकांनी त्यांच्या घरी कधी जायचे व दुसऱ्या दिवशी नंतर सेंटरला परीक्षा देण्यासाठी कधी पोहोचायचे असा प्रश्न शिक्षकांना पडला आहे. दुसऱ्या दिवशी पेपर कसा द्यायचा? दुसऱ्या दिवशी सीटीईटी साडेआठ वाजता सेंटरवर हजर राहण्याचे आदेश दिलेले आहेत. तर मग सेंटरवर पोहोचायचे कधी आणि पेपर दुसऱ्या दिवशी द्यायचा कधी हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.

ZP Election
शिक्षकांवर अन्याय, TET परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द करा; गुरुजींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पहिली ते आठवीत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना हा प्रश्न भेडसावत आहे. सर्व शिक्षक हे सीटीईटी पेपर देणार आहेत. सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की, शिक्षकांनी एक सप्टेंबर 2027 पर्यंत टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. शिक्षक उत्तीर्ण न झाल्यास त्यांची सेवा आपोआप बंद केली जाईल किंवा त्यांना राजीनामा द्यावा लागेल. जर शिक्षकांनी आत्ताची परीक्षा इलेक्शनमुळे दिली नाही तर त्यांचा १ पेपर इलेक्शनमुळे जाणार आहे.

ZP Election
TET Paper Leak: टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य सूत्रधारासह १८ जणांना बेड्या, राज्यभरात रॅकेट?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com