TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

TET Exam Maharashtra : यंदा राज्यातील 2 लाख शिक्षकांचं टेन्शन वाढलंय..कारण दिवाळीत विद्यार्थ्यांना नाही तर शिक्षकांना परीक्षा द्यावी लागणार आहे.. मात्र त्याचं कारण काय आहे?
TET Exam Maharashtra
TET Exam Maharashtrax
Published On

TET Exam News : यंदाच्या दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांनाच अभ्य़ास करावा लागणार आहे. त्याला कारण ठरलाय सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय. शालेय शिक्षण विभागानं 13 फेब्रुवारी 2013 ला आदेश काढून प्राथमिक शाळेतील शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली होती. मात्र आता न्यायालयानं 2013 पूर्वी नोकरीला लागलेल्या सर्वच शिक्षकांना ही परीक्षा बंधनकारक केली आहे. वर्षातून एकदाच घेतली जाणारी ही परीक्षा 23 नोव्हेंबरला होणार असल्यान दिवाळीच्या सुट्टीत शिक्षकांना अभ्यासाचे धडे गिरवावे लागणार आहेत..

राज्यात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांची संख्या 87 हजार 440 आहे. या शाळांमध्ये 4 लाख 79 हजार शिक्षक शिकवतात. त्यातील अंदाजे 1 लाख 49 हजार शिक्षकांना टीईटी परिक्षा द्यावी लागणार आहे. धक्कादायक म्हणजे, 53 वर्ष वय असणाऱ्या शिक्षकांना अवघ्या 2 वर्षात टीईटी उर्त्तीण व्हावं लागणार आहे.. नाहीतर त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागेल.

TET Exam Maharashtra
मासेप्रेमी खवय्यांनो सावधान! पापलेट तुमच्या ताटात दिसणार नाही? पापलेट मासा नामशेष होण्याच्या मार्गावर?

दरम्यान शिक्षकांना पदोन्नतीच्या प्रत्येक टप्प्यावर 'टीईटी'ची अट घातल्याने सेवाज्येष्ठ शिक्षकांऐवजी टीईटी उत्तीर्ण असलेला ज्युनिअर शिक्षक मुख्याध्यापक होणार आहे. त्यामुळे संघटना आणि शिक्षकांकडून या निर्णयाला विरोध केला जातोय. दुसरीकडे शाळाबाह्य कामाच्या जबाबदारीने शिक्षक त्रस्त आहेत. निवडणूक आणि इतर कामांचा बोजा आहे. त्यात मनुष्यबळ कमी असल्याने कामाचा ताण वाढल्याची तक्रार आहे. अशात टीईटी उत्तीर्ण होण्याची जाचक अट घातल्याने शिक्षकांचा मनस्ताप आणखी वाढलाय. अशा स्थितीत किती शिक्षक ही पात्रता परीक्षा गांभीर्याने घेतात आणि पास होतात ते पाहणं महत्वाचं आहे.

TET Exam Maharashtra
Fact Check : अमित शाहांनी मागितला नरेंद्र मोदींचा राजीनामा? ऑपरेशन सिंदूरदरम्यान मोठी चूक झाली? Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com