Thane Traffic: ठाणे ते भिवंडी २ तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांचा, भिवंडी बायपास कधीपर्यंत सुरू होणार? तारीख आली समोर

Thane-Bhiwandi Bypass Road: ठाणे- भिवंडी प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. २ तासांचा प्रवास फक्त १० मिनिटांवर येणार आहे. भिवंडी बायपास कधी सुरू होणार याची तारीख समोर आली आहे.
Thane Traffic: ठाणे ते भिवंडी २ तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांचा, भिवंडी बायपास कधीपर्यंत सुरू होणार? तारीख आली समोर
Thane-Bhiwandi Bypass RoadSaam Tv
Published On

Summary -

  • ठाणे ते भिवंडी प्रवास लवकरच सुसाट होणार आहे

  • भिवंडी बायपास मार्च २०२६ पासून सुरू होणार

  • २ तासांचा प्रवास फक्त १० मिनिटांवर येणार

  • हा मार्ग समृद्धी महामार्गाशी जोडण्यात येणार आहे

  • मुंबई–नाशिक प्रवास देखील अधिक जलद होईल

ठाणे ते भिवंडी आणि मुंबई ते नाशिक प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या मार्गावरील प्रवास लवकरच सुसाट होणार आहे. कारण मुंबई- नाशिक महामार्गावरील भिवंडी बायपास मार्ग लवकरच सुरू होणार आहे. या बायपासचे काम मार्च २०२६ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती शनिवारी विधानपरिषदेत चर्चेदरम्यान देण्यात आली. त्यामुळे लवकरच या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.

ठाणे ते भिवंडी प्रवासादरम्यान भिवंडी बायपासवर मोठी वाहतूक कोंडी होते. या ठिकाणी वाहनं तासंतासं अडकून राहतात. याठिकाणावरून प्रवास करताना ठाण्यावरून भिवंडीत पोहचण्यासाठी २ ते ३ तासांचा कालावधी लागतो. पण आता भिवंडी बायपास तयार झाल्यानंतर प्रवासाचा कालावधी अवघ्या १० मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाचून प्रवास सुसाट होण्यास मदत होणार आहे. महत्वाचे म्हणजे हा मार्ग समृद्धी महामार्गाला जोडला जाणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा मुंबईतील समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी देखील होणार आहे.

Thane Traffic: ठाणे ते भिवंडी २ तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांचा, भिवंडी बायपास कधीपर्यंत सुरू होणार? तारीख आली समोर
Kalyan Traffic : कल्याण पूर्व-पश्चिम जोडणारा पूल १० दिवस बंद राहणार, पर्यायी मार्ग काय? जाणून घ्या

२०१८ मध्ये ठाणे- भिवंडी बायपास मार्गाच्या कामाला सुरूवात झाली होती. २०१८ मध्ये या मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत ठेकेदार नेमून सुरू करण्यात आले होते. पण कोरोना काळात या प्रकल्पाच्या कामात अडथळे आले. त्यानंतर या ठिकाणी प्रचंड वाहतूक कोंडी होऊ लागली. त्यामुळे या मार्गाचे काम २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे देण्यात आले. या मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. हा मार्ग कधी सुरू होणार याची सर्वजण वाट पाहत आहेत.

Thane Traffic: ठाणे ते भिवंडी २ तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांचा, भिवंडी बायपास कधीपर्यंत सुरू होणार? तारीख आली समोर
Pune Traffic: पुणेकरांसाठी गुड न्यूज! विमानतळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी सुटणार, सरकारचा जबरदस्त प्लान

ठाणे- भिवंडी बायपास रोडवरून कल्याण, डोंबिवली या ठिकाणी राहणारे नागरिक मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. भिवंडीमध्ये अनेक कंपन्या, गोदामे आहेत. त्यामुळे याठिकाणी येणारे मोठे कंटेनर, टेम्पो यासारख्या वाहनांची संख्या जास्त असते. या वाहनांची रहदारी जास्त असल्यामुळे वाहतूक कोंडी आणखी होते. या मार्गावरून नाशिक, कल्याण, डोंबिवली या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. पण आता भिवंडी बायपास तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटेल.

Thane Traffic: ठाणे ते भिवंडी २ तासांचा प्रवास होणार फक्त १० मिनिटांचा, भिवंडी बायपास कधीपर्यंत सुरू होणार? तारीख आली समोर
Traffic Police: ट्राफिक पोलिस सोडून इतर पोलिस वाहनांवर कारवाई करू शकतात का? मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com