Bengaluru-Mumbai Superfast Train Saam Tv
मुंबई/पुणे

Bengaluru-Mumbai Superfast Train: बंगळुरु ते मुंबई सुपरफास्ट ट्रेन धावणार; या दिवशी होणार सुरु; वंदे भारतवरही अपडेट

Bengaluru-Mumbai Vande Bharat Sleeper Start in June: आता बंगळुरु ते मुंबई हा प्रवास खूप जलद होणार आहे. आता या मार्गासाठी सुपरफास्ट ट्रेन सुरु केली जाणार आहे.

Siddhi Hande

मुंबई ते बंगळुरु सुपरफास्ट ट्रेन धावणार

जूनअखेरीस होणार सुरु

दोन राज्यांना होणार फायदा

भारतात रेल्वेचे जाळे खूप वेगाने पसरत आहे. यामध्ये आता आणखी अनेक ट्रेनचा समावेश करण्यात येणार आहे. लवकरच बंगळुरु मुंबई सुपरफास्ट ट्रेन लाँच होणार आहे. ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांना आश्वासन दिले आहे की, बहुप्रतिक्षित बंगळुरु- मुंबई सुपरफास्ट ट्रेन जून अखेरपर्यंत सुरु केली जाईल.

मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, ही ट्रेन मध्य कर्नाटकमधून जाणार आहे. पुढे तुमकुरु, दावणगेरे, हावेरी, हुबळी-धारवाड आणि बेळगाव मार्गाने मुंबईला जाणार आहे. याचसोबत येत्या काही दिवसात सुपरफास्ट ट्रेनचे वंदे भारत स्लीपरमध्ये रुपांतर करण्यासही सहमती दर्शवली आहे.

प्रल्हाद जोशी यांनी सांगितले की, आधुनिक प्रवासी सुविधा पुरवण्यासोबत हुबळी रेल्वे पुनर्विकासावरही चर्चा करण्यात आली. पुढे लोकापूर-सावदत्ती आणि धारवाड रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाची मागणी केली आहे. याला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी प्रतिसाद दिला आहे. या घोषणेमुळे बंगळुरु आणि मुंबई दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. तसेच कर्नाटकातील हुबळी-धारवाड प्रदेशातील पायाभूत सुविधांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे, असं प्रल्हाद जोशी यांनी सांगितले आहे.

बंगळुरु ते मुंबई कनेक्टिव्हिटी वाढणार

बंगळुरु ते मुंबई सुफरफास्ट ट्रेनमुळे दोन राज्ये जोडली जाणार आहेत. यामुळे कर्नाटक, बेळगाव या सीमालगतच्या भागांना खूप फायदा होणार आहे. या ट्रेन जून अखेरपर्यंत सुरु होणार आहे. यामुळे कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. यामुळे प्रवास खूप सुपरफास्ट होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT