

रेल्वे लवकरच नवीन नियम लागू करणार
आता धावत्या ट्रेनमध्ये चढणे किंवा उतरणे कायद्याने गुन्हा
प्रवाशांना बसणार २००० रुपयांचा दंड
रोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मुंबई लोकल असो किंवा इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या रेल्वे असो अनेकजण रोज प्रवास करतात. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता धावत्या रेल्वेमध्ये चढणे तुम्हाला महागात पडू शकते. धावत्या रेल्वेमध्ये चढणे हे धोक्याचे आहे. त्यामुळे जीवावर बेतू शकते. दरम्यान, आता या प्रवाशांवर कारवाई केली जाणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आता जे प्रवासी धावत्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न करतील त्यांना २,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. सध्या प्लॅटफॉर्मवरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हेच अपघात रोखण्यासाठी नवीन योजना राबवली जात आहे. आता आरपीएफ हे नवीन धोरण लागू करणार आहे.
कोची येथील अधिकाऱ्यांचा हवाला देत म्हटलंय की, आरपीएफ आता धावत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या आणि उतरणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. हा एका शिक्षापात्र गुन्हा आहे. याआधी या गुन्ह्यांसाठी ताकीद दिली जात असे किंवा रेल्वे न्यायालयाद्वारे कायदेशीर कारवाई केली जात असे. आता या गुन्ह्यासाठी दंड आकारला जाणार आहे.
रेल्वे कायद्याच्या कलम १५६ अंतर्गत या धोकादायक वर्तनाला गुन्हा मानण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत या गुन्ह्यासाठी ताकीद दिली जात होती. शेवटचा उपाय म्हणून न्यायालयात जात होता. परंतु आता जागेवरच दंड आकारला जाणार आहे. या कृत्यांसाठी २००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, असं एका आरपीएफ अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
धावत्या रेल्वेमध्ये चढू किंवा उतरु नये. प्रवाशांनी जीव धोक्यात घालून कोणतेही कृत्य करु नये, हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे आता रेल्वेतून प्रवास करताना तुम्हाला सांभाळून करावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.