ठाणे आणि रायगड जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडला आहे. बदलापुरातील एरंजाड, आंबेशिव गावाजवळ उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलीय. जलपर्णीमुळे नदीतील जैवविविधता धोक्यात आली आहे. हेच पाणी बदलापूरसह आसपासच्या अनेक गावांमध्ये पिण्यासाठी वापरलं जातं त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे. या पाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आजार होऊ शकतात. त्यामुळे शासनाने योग्य पाऊल उचलायला हवे.
उल्हास नदी ठाणे जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, नवी मुंबईची तहान हीच उल्हास नदी भागवते. मात्र, बदलापुरात या नदीला प्रदुषणाचा विळखा बसलाय. खरवई मधून मोठ्या प्रमाणात एमआयडीसीचं पाणी उल्हासनदीत येऊन मिसळतं. याशिवाय बदलापूर शहरातल्या विविध नाल्यांमधून आलेले सांडपाणी हे देखील उल्हास नदीत सोडलं जातं.
वाढत्या प्रदुषणामुळे उल्हास नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. उल्हास नदीच्या संपूर्ण पात्रात जलपर्णीचा गालिचा पसरलाय. त्यामुळे नदीतील माशांचं प्रमाण घटलंय. संतापजनक बाब म्हणजे जलपर्णीने उल्हास नदीला व्यापलेलं असताना नदीच्या स्वच्छतेसाठी शासकीय स्तरावरून कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत त्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये संतापाची लाट उसळलीय.
जलपर्णीमुळे जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे. अस्वच्छ आणि प्रदूषित पाण्यावर जलपर्णी वाढते. जलपर्णी पसरट असल्यामुळे सूर्याची किरण पाण्यात खोलवर जात नाहीत. त्यामुळे पाण्यातील ऑक्सिजनच्या प्रमाणात घट होते.ऑक्सिजन घटल्याने मासे आणि इतर जलचरांचा अस्तित्व धोक्यात येते. एका जलपर्णीत शेकडो बिया असतात, त्या बियांमुळे पाण्यात जलपर्णीची झपाट्याने वाढ होते. या अस्वच्छ पाण्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.