Wardha News : ऑक्सिजन पार्कला आग; पाच ते दहा हजार झाडे जळून खाक, वर्धेच्या हनुमान टेकडीवरील घटना

Wardha : वर्धा येथील हनुमान टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंच, विविध सामाजिक संघटना, जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले आहे. ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन
Wardha News
Wardha NewsSaam tv
Published On

चेतन व्यास 
वर्धा
: वर्धेच्या हनुमान टेकडी येथे वैद्यकीय जनजागृती मंचने २०१४ मध्ये ऑक्सिजन पार्कची निर्मिती केली. हा ऑक्सिजन पार्क महाराष्ट्रातला पहिला ऑक्सिजन पार्क होता. या ऑक्सिजन पार्कमध्ये जवळपास पंचवीस हजार झाडे आहे. मात्र आज दुपारी या ऑक्सिजन पार्कला आग लागली. आगीत जवळपास पाच ते दहा हजार झाडे जळून खाक झाले आहेत. सोबतच झाडांच्या संगोपणासाठी लावण्यात आलेल्या पाण्याच्या ड्रीप, पाईप आणी पाण्याची मोटरही जळाली आहे.

वर्धा येथील हनुमान टेकडीवर वैद्यकीय जनजागृती मंच, विविध सामाजिक संघटना आणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने ऑक्सिजन पार्क तयार करण्यात आले आहे. ऑक्सिजन पार्कमध्ये वृक्षाची लागवड करून त्याचे संगोपन केले जात आहे. या ऑक्सिजन पार्कमध्ये अनेकदा आग लागली आहे. मात्र ते तातडीने आटोक्यात आणली जाते. आजही दुपारी येथे आग लागल्याचे महात्मा गांधी अंतराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या नागरिकांच्या लक्षात आले. आग लागताच तेथील अग्निशमक यंत्रच्या सहाय्याने आग विजविण्यात आली.  

Wardha News
Amalner Bajar Samiti : अमळनेर बाजार समितीत हरभऱ्याची विक्रमी आवक; भाव स्थिरावले, वाहनांच्या लागल्या रांगा

झाडे जळून खाक 

मात्र ऑक्सिजन पार्कमध्ये लागलेली आग विझविण्यापर्यंत तेवढ्या वेळेत ऑक्सिजन पार्कमधील पाच ते दहा हजार झाडे जळून खाक झाली. एवढच नव्हे तर आगीत झाडाच्या संगोपनासाठी लावण्यात आलेले ड्रीप, पाईप आणि मोटर देखील जळाली आहे. परिसरात काही युवक सिगरेट व गांजा ओढण्यासाठी येतात. ते येथेच फेकून जातात. यामुळे नेहमीच आग लागल्याची घटना घडत असल्याचे सांगितले जात आहे. 

Wardha News
Jalna Police : वाळू माफियांची परेड; जालना पोलिसांनी ३० माफियांकडून लिहून घेतले बंदपत्र

प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी 
दरम्यान सामाजिक संघटनानी पर्यावणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करत संगोपन केले. मात्र काही टवाळखोरांच्या चुकीने अश्या घटना घडतात. या प्रकारबाबत प्रशासनालाही अवगत करण्यात आले होते. मात्र पोलिसांकडून अद्याप नशेखोर टवाळखोरांवर कोणतीच कारवाई न केल्याने त्यांची हिम्मत वाढत आहे. किमान वृक्षारोपण होत नसेल, तर अश्या प्रकारे नुकसान करू नये अशी विनंती वैद्यकीय जनजागृती मंचकडून करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com