Badlapur School Saam tv
मुंबई/पुणे

Badlapur School : शाळेमध्ये शिवी देणे महागात पडणार; विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केल्यास पालकांना दंड; अनोख्या अभियनाची सर्वत्र चर्चा

Badlapur School rules : बदलापुरातील शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिवी देणे महागात पडणार आहे. विद्यार्थ्यांनी शिवीगाळ केल्यास पालकांना दंड भरावा लागणार आहे.

Vishal Gangurde

मयुरेश कडव, साम टीव्ही

बदलापूर : पालकांनो तुम्हाला तुमच्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण आता मुलांनी शाळेत शिवी दिल्यास पालकांनाच दंड भरावा लागणार आहे. बदलापूरमधील सर्व शाळांमध्ये हा नियम लागू होणार आहे. नव्या नियमामुळे बदलापूरमधील सर्व शाळांमधून आता शिवी हद्दपार होणार आहे. विद्यार्थ्यांच्या जिभेला वळण लावण्यासाठी शिवीमुक्त शाळा अभियान राबवण्यात येणार आहे.

बदलत्या जीवनशैलीचा परिणाम म्हणून शालेय विद्यार्थ्यांची भाषा खालच्या स्तरावर घसरत चालली आहे. त्यांच्या तोंडातली शिवराळ भाषा काढून टाकण्यासाठी बदलापुरात शिवीमुक्त शाळा हे अनोखं अभियान राबविण्यात येत आहे. आमदार किसन कथोरे यांच्या संकल्पनेतून सर्व शाळांमध्ये ही मोहीम राबवली जाणार आहे.

बदलापूरच्या आदर्श विद्या मंदिरात मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेतून या अभियानाला सुरुवात झाली. अलीकडच्या काळात टीव्ही आणि मोबाईलचा प्रभाव वाढला आहे. तसंच मुलांकडे पालकांचं होत असलेल्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिव्या देण्याचं प्रमाण वाढलं आहे. मुलं असभ्य वर्तन करू लागली आहेत. हे चित्र बदलण्यासाठी बदलापुरातील सर्व शाळांमध्ये शिवीमुक्त शाळा अभियान राबवलं जाणार आहे. या सर्व शाळांमध्ये कडक नियमावली केली जाईल.

मुलांच्या वर्तनावर शिक्षकांचं लक्ष असेल. मुलांनी शिवीगाळ केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसंच हा दंड पालकांना भरावा लागेल. या अभियानामुळे मुलांवर निश्चितच चांगले संस्कार होतील. त्यांच्या भाषेचा दर्जा सुधारेल, एक सुजाण पिढी तयार करण्यासाठी हे अभियान पथदर्शी ठरेल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला आहे. बदलापुरातील शिवीमुक्त शाळा अभियनाची कशा प्रकारे अंमलबजावणी होते, अभियनावर विद्यार्थी आणि पालकांची प्रतिक्रिया काय उमटते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath shinde: समोर अमित शाह, एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरातची' घोषणा|VIDEO

Eknath Shinde : जय गुजरात; एकनाथ शिंदेंची पुण्यात अमित शहांसमोरच घोषणा

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

SCROLL FOR NEXT