Badlapur Palika : चिकन वेस्टेजपासून कंपोस्ट खत निर्मिती; बदलापूर नगरपालिकेचा अभिनव प्रयोग

Badlapur news : बदलापुर शहरात साधारणत: २०० ते २५० चिकन आणि मासे विक्रेते आहेत. दिवसाकाठी साडेतीन ते चार टन वेस्टेज तयार होत असते. बहुतांश विक्रेते वेस्टेज कुठल्यातरी भागात किंवा नाल्यात टाकतात
Badlapur Palika
Badlapur PalikaSaam tv
Published On

मयूरेश कडव 
बदलापूर
: मांस विक्री करणाऱ्यांकडून यातून निघणारी घाण अनेकदा मोकड्या जागेवर फेकली जात असते. यामुळे घाण व दुर्गंधी पसरत असते. मात्र बदलापूर नगरपालिकेने यावर प्रक्रिया करत चिकन वेस्टेज पासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्याच्या अभिनव प्रकल्पास सुरवात केली आहे. यामुळे होणारे प्रदूषण आणि दुर्गंधीतून बदलापूरकरांची लवकरच सुटका होणार आहे. 

बदलापुर शहरात साधारणत: २०० ते २५० चिकन आणि मासे विक्रेते आहेत. यांच्याकडून दिवसाकाठी साडेतीन ते चार टन वेस्टेज तयार होत असते. यातील बहुतांश विक्रेते हे वेस्टेज शहराच्या कुठल्यातरी भागात किंवा नाल्यात टाकतात. त्यामुळे दुर्गंधी पसरते, तसेच मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. याचा त्रास आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत असतो. वर्षानुवर्षे हा त्रास सहन करावा लागत असतो. 

Badlapur Palika
Santosh Deshmukh Case: “भावाला सोडा, काही करू नका, २० वेळा विनंती तरी हत्या”; धनंजय देशमुखांनी सांगितला "त्या" दिवशीचा घटनाक्रम

दीड टन वेस्टेजवर दररोज प्रक्रिया 

दरम्यान त्यावर उपाय म्हणून बदलापूर नगरपालिकेमार्फत कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून प्रायोगिक तत्वावर दीड टन वेस्टेजवर दररोज प्रक्रिया केली जात आहे. लवकरच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं राबवला जाईल; अशी माहिती मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिली. हा प्रकल्प उभारणी करण्यात येणार असल्याने होणारे प्रदूषण आणि दुर्गंधी टाळता येणार आहे. 

Badlapur Palika
Chandrapur : कर्जाच्या वसुलीला आले दोनशे रुपयांची लाच घेऊन परतले; बैलजोडी जप्तीची शेतकऱ्याला धमकी

तर त्यांच्यावर कडक कारवाई 

बदलापूर नगरपालिकेनं चिकन तसेच माशांच्या वेस्टेजपासून कंपोस्ट खताची निर्मिती करणारा प्रकल्प उभारत आहे. यात विक्रेत्यांचा देखील सहभाग आवश्यक आहे. तर जे चिकन व्यावसायिक वेस्टेज जमा करण्यासाठी पालिकेला सहकार्य करणार नाही; त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असा इशाराच मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com