Chandrapur : कर्जाच्या वसुलीला आले दोनशे रुपयांची लाच घेऊन परतले; बैलजोडी जप्तीची शेतकऱ्याला धमकी

Chandrapur News : शेतकरी बँकांकडून पीक कर्ज घेत असतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला असलेले अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही
Chandrapur News
Chandrapur NewsSaam tv
Published On

चंद्रपूर : शेतकऱ्याने शेतीसाठी पीक कर्ज घेतले होते. कर्जाची परतफेड करू न शकल्याने बँकेचे काही अधिकारी वसुली करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी बैलजोडीची जप्ती करतो, अशी धमकी देत बँकेच्या कर्मचाऱ्याने शेतकऱ्याकडून दोनशे रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराचा व्हीडिओ सध्या समाजमाध्यमात चांगलाच व्हायरल होत आहे. 

शेतकरी बँकांकडून पीक कर्ज घेत असतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच चांगला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याला असलेले अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. यामुळे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करू शकत नाही. यामुळे थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांकडून कर्ज वसुली करण्यात येत आहे. अशाच प्रकारे चंद्रपूर जिल्ह्यात काही अधिकारी शेतकऱ्याकडे वसुलीसाठी आले होते. मात्र शेतकऱ्याकडून लाच घेऊन गेल्याचा प्रकार समोर आला आहे. 

Chandrapur News
Success Story: नांदेडच्या शेतकऱ्याची कमाल! औषधी मिरचीच्या उत्पादनातून ६ महिन्यात ४५ लाखांची कमाई

बैलजोडी जप्तीची धमकी 

चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील ही घटना आहे. कर्जदार शेतकरी एका टेम्पोमधून बैलजोडी नेताना बँकेच्या वसुली पथकाची गाडी समोर उभी केली. त्यातून दोन कर्मचारी टेम्पोत बसलेल्या शेतकऱ्याला बैलजोडी जप्तीची धमकी देऊ लागले. वसुली पथकाच्या वाहनावर ब्रम्हपुरी अर्बन बँकेचा फलक लावल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

Chandrapur News
Badlapur Home : बदलापुरात घराची किंमत दुप्पट, ८ लाखांचे घर आता २० लाखांना

दोनशे रुपयांची नोट देताच माघारी परतले 

शेतकरी दरवर्षी शेतीसाठी खासगी बँकांकडून कर्ज काढतात. शेतीचा हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्जाची परतफेडही केली जाते. शेतकरी आता पुढील हंगामाच्या तयारी लागला आहे. असाच एक वयोवृद्ध शेतकरी टेम्पोमध्ये बैलजोडी घेऊन जात असताना अर्बन बँकेच्या वसुली पथकाने त्याला अडवले. शेवटी तडजोड करीत शेतकऱ्याने २०० रुपयांची नोट त्या कर्मचाऱ्याच्या हातात दिल्यानंतर तो माघारी गेला. कर्ज वसुलीच्या नावावर बँकेचे कर्मचारी शेतकऱ्यांशी कसे वागतात, याचा हा नमुना आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com