
स्त्रियांसाठी प्रतापसिंह महाराज यांनी सर्व प्रथम शाळा सुरु केल्याचा दावा भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला आहे. उदयराजे भोसले यांच्या दाव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. उदयनराजे यांच्या वक्तव्याचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. उदयनराजे यांच्या वक्तव्याचा समाचार ओबीसी नेते मंगेश ससाने यांनी घेतला. त्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उदयनराजे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. कोण प्रतापसिंह? आम्ही ओळखत नसल्याचं म्हणत लक्ष्मण हाके यांनी टीका केली आहे.
उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी टीकास्त्र डागलं. ' कोण प्रतापसिंह, तत्कालीन राजे इंग्रजांच्या क्लबचे सदस्य होण्यासाठी धडपडत होते. तिथल्या क्लबमध्ये जाऊन काय करत होते. उदयन महाराज महात्मा फुले यांच्या जयंती दिवशी फुले वाड्यावर जातात. त्या दिवशी अशी वक्तव्य करतात, अशा शब्दात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उदयनराजे यांना फटकारले.
'उदयनराजे एकीकडे महापुरुषांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्याबद्दल कठोर कायदा करा. त्यांना शिक्षा करा असे म्हणतात. दुसरीकडे अशी वक्तव्ये करतात. उदयनराजे काल काय बोलले? आज काय बोलले? त्यानंतर उद्या काय बोलणार? याचा अंदाज येत नाही. तरीही गादीचा वारस म्हणून त्यांचा आदर करतोच. त्यांनी बेजबाबदारपणाची वक्तव्ये करू नये, असे हाके म्हणाले.
'इतिहास अभ्यासक ,समाजसुधारकांचा सल्ला उदयनराजे यांनी घ्यावा. त्यांनी शिक्षण क्षेत्रात काम केले, त्यांचे काम उदयनराजे यांना मान्य नाही का? महात्मा फुले यांच्या जयंती दिवशी असे वक्तव्य करण्याची गरज काय? असा प्रश्न हाके यांनी उपस्थित केला आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले,' थोरले प्रतापसिंह महाराज यांचं महात्मा फुले यांनी अनुकरण केलं. थोरले प्रतापसिंह महाराज यांनी स्वत:च्या राजवाड्यात सर्वप्रथम महिलांसाठी शाळा सुरू केली. त्या राजवाड्यात कालांतराने ज्यांनी देशाचं संविधान लिहिलं, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण त्याच राजवाड्यात झालं'.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.