ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एक गाण तयार केले आहे.
या गाण्यानंतर वाद उफाळला आहे. शिंदेसेनेने त्याच्या सेटची तोडफोडदेखील केली आहे.
कुणाल कामरा आहे तरी कोण? तुम्हाला माहितीये का?
मिडिया रिपोर्टनुसार, कुणाल कामराचा जन्म ३ ऑक्टोबर १९८८ रोजी झाला.
मिडिया रिपोर्टनुसार,कुणालने जय हिंद कॉलेजमधून बी.कॉमला अॅडमिशन घेतले होते. परंतु दुसऱ्या वर्षी ड्रॉप आउट झाला.
कुणाल ने सुरुवातील प्रोडक्शन असिस्टंट म्हणून काम केले.
यानंतर त्याने कॉमेडी करण्यास सुरुवात केली. तो सध्या स्टँड अप कॉमेडियन म्हणून शो करतो.