मुंबई/पुणे

Badlapur Protest: आईच्या ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी निघाला, अन् थेट तुरुंगात गेला!

Badlapur Protest: बदलापूर रेल्वे स्थानकावर झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केलीय. या आंदोलनानंतरच्या धरपकडीत भूषण दुबे नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली. मात्र या युवक या आंदोलनात सहभागी नव्हता.

Bharat Jadhav

अजय दुधाणे , साम प्रतिनिधी

चिमुकल्या मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर मंगळवारी बदलापुरात झालेल्या आंदोलनानंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. या धरपकडीत आंदोलनात नसलेल्यांनाही पोलिसांनी पकडल्याचा आरोप आता होऊ लागलाय. भूषण दुबे नावाच्या तरुणालाही पोलिसांनी अशाच प्रकारे काहीही चूक नसताना पकडून थेट तुरुंगात टाकल्याचा आरोप त्याच्या वडिलांनी केलाय. भूषणच्या जामिनासाठी त्याच्या वयोवृद्ध आजारी वडिलांची मात्र चांगलीच ससेहोलपट झालीय.

बदलापूर पश्चिमेला राहणारा भूषण दुबे याच्या आईच्या डोळ्यांना मोतीबिंदू झाला असून त्याचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टरांची तारीख घेण्यासाठी म्हणून भूषण हा आईची फाईल घेऊन बदलापूरहून अंबरनाथला दवाखान्यात यायला निघाला होता. मात्र याच दरम्यान पोलिसांनी बदलापूर रेल्वे स्थानकात लाठीचार्ज केला आणि आंदोलक कात्रपच्या दिशेने पळत सुटले. या आंदोलकांची पोलिसांनी पाठलाग करून धरपकड केली.

यातच भूषण दुबे यालाही पोलिसांनी पकडलं. यावेळी भूषण याने पोलिसांना आपण आईची हॉस्पिटलची फाईल घेऊन डॉक्टरांकडे ऑपरेशनची तारीख घेण्यासाठी जात असल्याचं सांगूनही पोलिसांनी त्याला न सोडल्याचा दावा भूषण याचे वयस्कर वडील कमताप्रसाद दुबे यांनी केला आहे.

भूषण याच्या अटकेची कोणतीही माहिती आम्हाला देण्यात आलेली नव्हती. भूषण याच्या एका मित्राने रात्री फोन करून आम्हाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर त्याला नेमकं कुठे ठेवलं आहे, हे देखील आम्हाला पोलिसांकडून सांगितलं जात नव्हतं. अखेर भूषण हा भिवंडीला असल्याची माहिती आम्हाला मिळाली, असा दावा भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांनी केला आहे. भूषणच्या जामिनासाठी कमताप्रसाद दुबे हे गुरुवारी दिवसभर उल्हासनगरच्या न्यायालयात फेऱ्या मारत होते.

मात्र या प्रकरणात पोलिसांनी आपलं म्हणणं न मांडल्यामुळे भूषणचा जामीन होऊ शकला नाही. भूषण याचे वडील कमताप्रसाद दुबे यांना उच्च मधुमेहाचा त्रास असून त्यांच्या पायाचे दोन्ही अंगठे कापलेले आहेत. तशाच अवस्थेत दुबे हे आपल्या मुलाच्या जामिनासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढत होते. आपल्या मुलाला विनाकारण अटक करण्यात आली असून त्याची सुटका करण्याची मागणी दुबे यांनी केली आहे.

दरम्यान, बदलापूर आंदोलना प्रकरणी बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिसांनी जे 3 गुन्हे दाखल केले आहेत, त्यात अटक करण्यात आलेले बरेच जण हे आंदोलनातील नसल्याचा दावा या आंदोलकांची बाजू न्यायालयात मांडणारे वकील अॅड. सत्यन पिल्ले यांनी केला आहे. अटक करण्यात आलेल्यांमधले काही जण विद्यार्थी असून त्यांच्याकडे कॉलेज, क्लास यांचे आयकार्ड सापडले आहेत.

काही जण नियमित कामावर जाणारे प्रवासी असून त्यांच्याकडे रेल्वेची तिकीटं आणि पास सापडले आहेत. काही जण आपल्या घरासमोर उभे राहून आंदोलन बघणारे रहिवासी आहेत. मात्र या सर्वांना पोलिसांनी विनाकारण अटक केल्याचा दावा ऍड. सत्यन पिल्ले यांनी केला आहे. या सगळ्यानंतर मंगळवारी झालेल्या आंदोलना प्रकरणी पोलिसांच्या हाती खरे आंदोलक न लागल्यामुळे जो दिसेल त्याची धरपकड करण्यात आली आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT