VIDEO: एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनावर ठाम, पोलिसांनी घेतलं ताब्यात

Pune Police Detain MPSC Student: एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली असली तरी देखील इतर मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते. या विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरूच ठेवले होते. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनीची पुणे पोलिसांकडून धरपकड सुरू आहे. एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलली असली तरी देखील इतर मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलनावर ठाम होते. या विद्यार्थ्यांकडून आंदोलन सुरूच ठेवले होते. परीक्षा पुढे ढकलली असली तरी ती किती दिवस पुढे ढकलण्यात आली आहे याबाबतचे परीपत्रक काढण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यामुळे उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सुरू ठेवले होते. या उपोषणादरम्यान काही विद्यार्थ्यांना भोवळ आली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी आंदोलनकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.

'उपोषण सोडल्यानंतर वारंवार विद्यार्थी तिथे बसतात. ट्राफिक ३ दिवसांपासून बंद आहे. त्यांना आम्ही वारंवार विनंती केली पण ते ऐकायला तयार नाही त्यामुळे आम्ही त्यांना ताब्यात घेतले असून त्यांना पोलिस ठाण्यात घेऊन जात आहोत.', असे पोलिसांनी सांगितले. तर आमचे उपोषण संपलेले नाही. आमची मागणी सरकारने मार्गी लावावी. आमच्या लोकांना काय झाले तर सरकारला आम्ही सोडणार नाही., असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com