Home Price Hike Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Home : बदलापुरात घराची किंमत दुप्पट, ८ लाखांचे घर आता २० लाखांना

PM Awas Yojana price hike : बदलापुरात पंतप्रधान आवास योजनेतील घरं महागणार आहेत. 8 लाखांचं घर 20 लाख रुपयांना मिळणार आहे. शासन ठेकेदारावर मेहरबान, मुदतवाढीमुळे प्रकल्प महागला आहे. 255 कोटी रुपयांचा प्रकल्प 434 कोटी रुपयांवर

Namdeo Kumbhar

मयुरेश कडाव

PM Awas Yojana Badlapur home price hike : बदलापुरात पंतप्रधान आवास योजनेतील स्वस्त घरं 8 लाख रुपयांऐवजी 20 लाख रुपयांना मिळणार आहेत. प्रकल्पाला उशीर करणाऱ्या ठेकेदाराला शासनानं तीन वेळा मुदतवाढ दिल्यामुळे प्रकल्पाची किंमत 255 कोटींवरून 434 कोटी इतकी झालीय. त्यामुळेच गरिबांसाठीच्या घरांसाठी आता दाम दुप्पट किंमत मोजावी लागणार आहे. बदलापुरातील बेलवली वालिवलीसारख्या ठिकाणी घरासाठी इतकी मोठी किंमत मोजणं परवडण्याजोग नाही. या प्रकल्पात मोठा घोटाळा झाला असून याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक संभाजी शिंदे यांनी केलीय. तसेच लोकांनी वाढीव किंमतीची घरं घेऊ नयेत असं आवाहन देखील त्यांनी केलय.

2019 मध्ये बदलापूर नगरपालिकेनं बेलवली इथल्या भूखंडावर पंतप्रधान आवास योजना प्रकल्प मंजूर करून घेतला. इथं 325 चौरस फूट क्षेत्रफळाची 2298 घरं बांधण्यात येणार होती. यापैकी 462 घरं झोपडपट्टी धारकांसाठी मोफत होती. तर 1836 घरं अल्प दरात नागरिकांना दिली जाणार होती. 11.20 लाख रुपये किंमतीच्या घरासाठी केंद्र सरकारकडून प्रत्येक घरामागे 2.50 लाख रुपये अनुदान दिलं जाणार होतं. याचाच अर्थ नागरिकांना हे घर 8 ते 9 लाख रुपयांमध्ये मिळणार होतं.

मात्र ठेकेदाराने वेगवेगळी कारणं देत कामाला विलंब लावला तसंच शासनाकडून 3 वेळा मुदतवाढ घेतली. परिणामी या प्रकल्पाची किंमत 255 कोटी रुपयांवरून 434 कोटी रुपये इतकी झालीय. त्यामुळे आता इथल्या घरासाठी नागरिकांना 20 लाख रुपये मोजावे लागणार आहेत. ठेकेदाराने लावलेला विलंब आणि प्रशासकीय दिरंगाई याचा भुर्दंड सर्वसामान्यांना कशासाठी? असा सवाल संभाजी शिंदे यांनी उपस्थित केलाय.

बदलापुरातल्या बेलवली-वालिवली सारख्या भागात 20 लाख रुपयात 325 स्क्वेअर फुटाचं घर परवडण्याजोगं नाही. त्यामुळे अव्वाच्या सव्वा किंमत देऊन लोकांनी ही घरं घेऊ नयेत असा आवाहन संभाजी शिंदे यांनी केलय. बदलापुरातील PMAY प्रकल्पात ठेकेदाराच्या विलंबामुळे 8 लाखांचे घर आता 20 लाखांना मिळणार. 255 कोटींचा प्रकल्प 434 कोटींवर; भाजप नेत्यांची चौकशीची मागणी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

Crime News : काकीनं नवऱ्यासमोर पुतण्यासोबत केलं लग्न, दोघांचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल; लव्ह बर्ड्सचे चक्रावणारे रील

MLA Sunil Shelke: आमदार सुनील शेळके यांच्या हत्येचा कट उघड; SIT शोधणार मास्टरमाईंड

SCROLL FOR NEXT