Police Lathi Charge On Protester Saam Tv
मुंबई/पुणे

Badlapur Protest: चिमुकल्यांसाठी न्याय मागणं महागात पडलं; आंदोलकांच्या कुटुंबीयांचा कोर्टाबाहेर हंबरडा

Badlapur Protest: बदलापूरमधील एका शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर नागरिकांनी बदलापूर रेल्वे स्टेशनवर रेल रोको संतप्त आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकर्त्यांवर गुन्हा दाखल केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

बदलापूरच्या चिमुकल्यांना न्याय देण्याची मागणी करून प्रशासनाला जागं करणाऱ्या आंदोलकांवरच गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळे बदलापुरकरांविरोधात संतापाची लाट उसळीय.. त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

बदलापूरमध्ये 2 चिमुकल्यांवर हैवानाने अत्याचार केले. पोलिसांनी कारवाई करण्यास दिरंगाई केली आणि बदलापूरकरांच्या भावनांचा उद्रेक झाला. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यासाठी आंदोलकांनी रेलरोको केला. चिमुकल्यांसाठी रस्त्यावर उतरून आक्रोश करणा-या आंदोलकांवरच पोलिसांनी कारवाईचं सत्र सुरू केलंय.

चिमुकल्यांसाठी लढणा-यांवरच कारवाई

बदलापूरमधील आंदोलनप्रकरणी रेल्वे पोलिसांनी तब्बल 2 हजारपेक्षा अधिक आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केलेत. तर बदलापूर पूर्व आणि पश्चिम पोलिस स्टेशनमध्ये 42 तर रेल्वे पोलिसांनी 30 जणांना अटक केलीय.. कल्याण कोर्टानं आंदोलकांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलीय. पोलिसांनी वेळेवर पीडितांची तक्रार नोंदवून आरोपीवर कारवाई केली असती तर हा मुद्दा एवढा पेटला नसता. या आंदोलनामुळे पोलिसांची लक्तरं वेशीला टांगली गेल्यामुळे सुडाच्या भावनेतून आंदोलकांवर कारवाई करत असल्याचा आरोप बदलापूरच्या वकिलांनी केलाय.

पोलिसांनी पीडित पालकांची वेळेवर दखल घेतली असती तर न्याय मिळवून देण्यासाठी बदलापूरच्या जनतेला रस्त्यावर उतरावं लागलं नसतं. त्यामुळे या प्रकरणी हलगरजीपणा करणा-यांवर कारवाई कऱण्याऐवजी प्रशासनाला जागं करणा-या आंदोलकांवरच कारवाईचा धडाका लावलाय. त्यामुळे बदलापूरच्या नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

SCROLL FOR NEXT